Home नांदेड जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत बंद राहतील ;...

जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत बंद राहतील ; जिल्हाधिकारी डॉ.विपीन

120
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत बंद राहतील ; जिल्हाधिकारी डॉ.विपीन

नांदेड,दि. २७ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.
या निवडणुकी दरम्यान नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढीलप्रमाणे बंद राहतील, असे आदेश निर्गमीत केले आहे.

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण दिवस तर मतदानाचा दिवस मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here