राजेंद्र पाटील राऊत
*खा.चिखलीकर यानी केला माजी सैनिक मेडाबलंमेवार याचा सन्मान*
नायगांव,(माधवराव घाटोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
आदर्श गांव शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथील सि.आर.पी दलातील सैनिक मोहन बालासाहेब मेडाबलंमेवार हे 22 वर्षे देशसेवा करुन सेवानिवृत्त झाले आहेत.26-11 शहिद पोलिस दिवसानिमित्त नायगांव येथे नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्याच्या सन्मानपत्र देऊन सन्मान केला.
नायगांव येथे पदवीधर मतदारसंघाची महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन माजी जि.प,सभापती शिवराज पाटील होट्टाळकर यानी कै.डि.बी.पाटील जिनिंग येथे केले होते.या कार्यक्रमात शहिद पोलिस जवानाना.व कै.डि.बी.पाटील होट्टाळकर याना भावपुर्ण श्रद्धांजली वाहाण्यात आली.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी दिलेल्या सन्मानपत्रात सैनिक मोहन मेडाबलंमेवार याच्या कार्येचे कौतुक करुन संपूर्ण 22 वर्षे सेवा केल्यानंतर भावी आयुष्य कुंटुबासाठी.व स्वतः साठी निरोगी व दिर्घआयुष्य च्या शुभेच्छा देऊन सन्मान केला.
याप्रसंगी भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर.आमदार राजेश पवार.माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर.जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर.श्रावण पा.भिलवंडे.बालाजीराव बच्चेवार.सौ.पुनमताई पवार.लक्ष्मणनराव ठक्करवाड.शिवराज पाटील होट्टाळकर.माणिकराव लोहगांवे.देवीदास पा.बोमनाळे.विठ्ठल पा.कत्ते.विजय होपळे.प्रा.जिवन चव्हाण.पत्रकार बाळासाहेब पांडे माजंरमकर.दिलीप वाघमारे.राजेन्द्र पा.शेळगांवकर.सतोष देशमुख शेळगांवकर.शिवराज वाढवणे.सुनिल देशाई व सुनिल रामदासी याची उपस्थिती होती