Home नांदेड मुखेड मुक्रामाबाद बिदर हायवेवर डंपर पलटी सुदैवानी जीवितहानी मात्र टळली.

मुखेड मुक्रामाबाद बिदर हायवेवर डंपर पलटी सुदैवानी जीवितहानी मात्र टळली.

139
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड मुक्रामाबाद बिदर हायवेवर डंपर पलटी सुदैवानी जीवितहानी मात्र टळली…

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी ,(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड मुखेड मुक्रमाबाद बीदर हायवेवर डंपर पलटी होऊन सुदैवाने जीवित हानी मात्र टळली आहे . आज दि. 24 नोव्हेंबर 2020 रोजी प्राप्त माहितीनुसार मुखेड बिदर 161 नवीन हायवे चे काम प्रगतीपथावर असून त्याचे काम अजयदीप कंट्रक्शन प्राइवेट लिमिटेड कंपनीकडे दिलेले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होत आले असून त्याचे काम सुरू असताना बिहारीपुर येथील पुलाचे काम चालू आहे. त्यातच पुलाचे काम चालू असताना डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून डंपर पुलाच्या खाली जाता जाता अर्धवट स्थितीत पलटी झाला मात्र सुदैवाने जीवितहानी मात्र टळली. डंपर क्रमांक MH12 SF 6418 या डंपर चालकास किरकोळ जखमा व मुका मार लागला असून सुदैवाने जीवित हानी मात्र टळली. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सावधगिरी बाळगा अशी विनंती प्रोजेक्ट मॅनेजर रेंगे यांनी रहदारी करणाऱ्या नागरिकास केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here