Home नांदेड मुखेड तालुक्यात एकूण 3234 पदवीधर मतदार बजावणार मतदानाचा हक्क..

मुखेड तालुक्यात एकूण 3234 पदवीधर मतदार बजावणार मतदानाचा हक्क..

111
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यात एकूण 3234 पदवीधर मतदार बजावणार मतदानाचा हक्क..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मुखेड तालुक्यातील 2728 पुरुष तर 506 महिला पदवीधर मतदारांची संख्या आहे एकूण 3234 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा तहसीलदार श्री काशिनाथ पाटील व निवडणूक विभागाचे श्री संदीप भुरे यांनी दिली. मुखेड तालुक्यात होणाऱ्या मतदानासाठी तालुका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. तालुका प्रशासनाने 1 आचारसंहिता पथक तैनात राहणार आहे. 2 FST पथक व 2 VST पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनात 10 वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. 12 केंद्राध्यक्ष 36 मतदान अधिकारी व 10 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची निवडणुक कामी नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात एकूण 10 मतदान केंद्र असून शहरात 3 व ग्रामीण भागात7 मतदान केंद्र आहेत. निवडणुकीसाठी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार काशिनाथ पाटील नायब तहसीलदार एस. एस. मामिलवाड निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक संदीप भुरे लिपिक सुनील कुलकर्णी ऑपरेटर बबलू शेख हे कामकाज पहात आहेत.निवडणुकीसाठी 10 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. यात मुखेड शहरात तहसील कार्यालय पुर्व बाजूस दोन मतदान केंद्रे तहसील कार्यालय पश्चिम बाजूस एक तसेच ग्रामीण भागात निती निकेतन हायस्कूल जांब बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबुलगा बु. जिल्हा परिषद हायस्कूल जाहूर जिल्हा परिषद शाळा चांडोळा जिल्हा परिषद कन्या शाळा मुक्रामाबाद व विद्या विकास हायस्कूल बाराहळी या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here