Home नांदेड अखेर शाळेची घंटा लांबणीवर. शाळा उघडण्याचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित. जिल्हा...

अखेर शाळेची घंटा लांबणीवर. शाळा उघडण्याचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित. जिल्हा प्रशासनाचे आदेश..

163

राजेंद्र पाटील राऊत

अखेर शाळेची घंटा लांबणीवर. शाळा उघडण्याचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित. जिल्हा प्रशासनाचे आदेश..

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )अखेर शाळेची घंटा लांबणीवर..
शाळा उघडण्याचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने शाळा उघडण्याची तारीख अखेर लांबणीवर ढकलण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची धाकधूक वाढली होती.
अखेर या सर्व घडामोडींची दखल घेत नांदेड जिल्ह्यातील नववी ते बारावी वर्गाच्या शाळा 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एक डिसेंबर नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय कोरोना या साथरोगाची परिस्थिती पाहूनच घेण्यात येईल . असे जिल्‍हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी शाळेची वाजणारी घंटा परत लांबणीवर पडली आहे. देशभरातील 2020-2021 शैक्षणिक वर्षातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा सुरू करण्यात आलेल्या नव्हत्या. नववी ते बारावी वर्गाची सुरुवात 23 नोव्हेंबर पासून करण्याचे ठरवले होते. शिक्षकांच्या तपासणी पूर्ण झाल्यानंतर 1 डिसेंबर नंतर सर्व स्थितीची पाहणी करून निर्णय घेण्यात येईल. असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर सभापती श्री संजय बेळगे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी कळविले आहे कोरोना या साथ रोगाच्या कठीण परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पालक वर्गांचा जीव भांड्यात पडला आहे.

Previous articleएसटीचं खासगीकरण करण्याचा महाआघाडी सरकारचा डाव, प्रविण दरेकरांचा आरोप
Next articleमास्क नाही भाजीपाला ही नाही डाँ.कांदबरी बलकवडे (महापालिका प्रशासक)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.