Home Breaking News जवाहर सलगर वाढदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबीर

जवाहर सलगर वाढदिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबीर

134
0

युवा नगरसेवक मा.जवाहर सलगर यांच्या वाढदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजन करून जपली सामाजिक बांधिलकी .

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील यादव आघाडीचे युवा उद्योजक मा.श्री.जवाहर सलगर विद्यमान नगरसेवक वडगांव नगरपरिषद वडगांव यांच्या आज योगायोगाने म्हणजे दिपावली दिवशी वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. राजकीय जीवनात नेहमी संघर्षाला सामोरे जावे लागणारे नेतृत्व कोणत्याही संकटाला धाडसाने सामोरे जाणारे व्यक्तीमत्व ,
खऱ्या अर्थाने संकटाला भक्कमपणे , निधड्या छातीने तोंड देणारा कार्यकर्ता म्हणजे जवाहर सलगर. राजकीय जीवनात त्यांना नेहमीच संघर्षाला सामोरे जावे लागले. माञ,न डगमगता वडगांव शहराच्या विकासासाठी त्यांनी आपली वाटचाल अगदी सक्रियपणे सुरू ठेवली आहे.साहजिकच या लढवय्या नेत्याचे भवितव्यही उज्ज्वलच आहे.आम्ही सर्वजण नेहमीच त्यांच्या सोबत राहू,अशा शुभेच्छा विविध मान्यवरांनी सलगर यांना दिल्या.
जवाहर सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका मंदिर , महालक्ष्मी नगर येथे आयोजित रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना सारख्या भीषण संकटामुळे यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. माञ सामाजिक भान राखत केवळ रक्तदान शिबीराचा उपक्रम हाती घेतला .
रक्तदान हे श्रेष्ठच दान आहे .
म्हणूच वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केले.६० रक्तदाते या शिबीरामध्ये सहभागी झाले होते.
या कार्यक्रम प्रसंगी माजी. पोलिस आयुक्त श्री.गुलाबराव पोळ , जिल्हा परिषद सदस्य श्री.अशोकराव माने, शिरोलीचे लोकनियुक्त सरपंच श्री.शशिकांत खवरे , शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्री. अभिजीत गायकवाड ,
मा.सुरज जमादार हातकणंगले तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष ,
श्री .सुहास राजमाने , हिराई हाँस्पिटलचे डॉ.श्री. मिलिंद हिरवे , इंजिनियर श्री. महेश पाटील , श्री.संपत दिंडे (चेअरमन) , सचिन पाटील ( काँन्ट्रक्टर ) , विजय रेवणकर खंडोबा ग्रूपचे अध्यक्ष ,पांडु पवार , किशोर गुरव , दिग्विजय कुशिरे , सचिन सणगर , किशोर गुरव, प्रशांत पाडळकर , अनिकेत गुरव ,
मोहन शिंदे कार्यकारी संपादक ,
अकबर पन्हाळकर ( सर )इत्यादी उपस्थित होते.

मोहन शिंदे ब्युरोचिफ कोल्हापूर युवा मराठा न्यूज.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील रस्त्याची अत्यंत दुर्दशा….
Next article*गरबड गावात वाघ बारस सण साजरा*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here