Home Breaking News 🛑 दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी🛑

🛑 दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी🛑

100
0

🛑 दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी🛑

 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज✍️ ).

मुंबई, 30 ऑक्टोबर : ⭕ तुम्ही दहावी किंवा बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असेल, तर भारत सरकारची नोकरी तुमची वाट पाहत आहे. केंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी नॉर्दन कोल्डफिल्ड्स लिमिटेड (NCL) कोल इंडिया (Coal India) मध्ये विविध पदांवर भरती आहे.

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी एनसीएलद्वारे जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे देण्यात आली आहे.

➡️ कोणत्या पदांच्या किती रिक्त जागा?

⭕ मुख्य इलेक्ट्रिशियन – १२० पदे.
⭕ मुख्य वेल्डर – १२० पदे.
⭕ HEMM मेकॅनिक – १२० पदे.
⭕ डेटा एन्ट्री ऑपरेटर – १२० पदे.
⭕ एकूण पदे – ४८० पदे.

➡️ अर्जाचा तपशील :-

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू अगदी सहजपणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १५ नोव्हेंबर २०२०

➡️ आवश्यक पात्रता :-

HEMM मेकॅनिक आणि मुख्य इलेक्ट्रिशिअनसाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे. मुख्य वेल्डर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्ससाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

➡️ वयोमर्यादा :-

उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांदरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

http://skillcms.in/ncl-hindi/⭕

Previous article🛑 मराठा क्रांती मोर्चाची पुणे मतदार संघाच्या निवडणुकीत उडी 🛑
Next article🛑 मराठा आरक्षणाच्या विलंबामुळे ११ वीच्या विद्यार्थीचे प्रवेश रखडले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here