🛑 टीआरपी घोटाळा- पोलीस विभागाला विनाकारण बदनाम करण्याचे काम: आरोग्यमंत्री 🛑
✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
नगर, 12 ऑक्टोबर : ⭕ ‘टीआरपी घोटाळ्यात कायद्याच्या अनुषंगाने धूळफेक करण्याचे काम काही चॅनलने केले आहे. ते सर्वजण शिक्षेस पात्र आहेत. यासर्वांना कायद्याच्या बडग्याच्या माध्यमातून कठोरातकठोर शिक्षा होण्याची गरज आहे. राज्यातील यंत्रणेला, पोलीस विभागाला विनाकारण बदनाम करण्याचे काम काही लोक जर करीत होते, तर आता ‘दूध का दूध पानी का पानी’ हे सिद्ध झाले आहे,’ असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या टीआरपी घोटाळ्याबाबत बोलताना व्यक्त केले. ते नगरमध्ये बोलत होते.
जालना येथे जात असताना टोपे हे काहीवेळासाठी नगरच्या सरकारी विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टीआरपी घोटळ्याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘दूध का दूध पानी का पानी’ हे व्हायलाच पाहिजे. आज काही चॅनलने तेवढे व्हिवर्स नसताना सुद्धा टीआरपीचा आकडा वाढवून दाखवला. घर बंद आहे, तरी सुद्धा टीव्ही चालू ठेऊन तेथे तो चॅनल चालू ठेवला. आज टीआरपीच्या माध्यमातून काही चॅनलने आमची रेटींग अशी आहे, हे करणे म्हणजे मोठी अनियमितता आहे. कायद्याच्या अनुषंगाने धुळफेक करण्याचे काम काही चॅनलने केले आहे. ते शिक्षेस पात्र आहेत, त्यांना निश्चित प्रकारे कायद्याच्या बडग्याच्या माध्यमातून कठोरातकठोर शिक्षा होण्याची गरज आहे. विनाकारण जर काही यंत्रणेला, पोलीस विभागाला बदनाम करण्याचे काम काही लोक करीत होते, ते आता ‘दूध का दूध पानी का पानी’ या माध्यमातून सिद्ध झाले आहेत. याप्रकरणात कायदेशीर ज्या गोष्टी आहेत, त्या करायला हव्यात,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.⭕