Home Breaking News *जि प पठावे दिगर गटाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय:- गणेश अहिरे*

*जि प पठावे दिगर गटाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय:- गणेश अहिरे*

133
0

*जि प पठावे दिगर गटाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय:- गणेश अहिरे*
*युवा मराठा न्युजच्या पाठपुराव्याला आले यश..!*
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
(साल्हेर नारायण भोये विभागीय संपादक )- नाशिक:-जि.प. पठावे दिगर गटाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे पठावे दिगर गटाचे सदस्य गणेश आहिरे यांनी स्पष्ट केले. साल्हेर येथील वनविभागाच्या गेस्ट हाउस सभाग्रहात आयोजित पठावे दिगर गटातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते .यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा चे सदस्य तुकाराम देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर चे सदस्य मधुकर चौधरी, विस्ताराधिकारी नितीन देशमुख, साल्हेरच्या सरपंच राणी भोये यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले.

पठावे दिगर गटातील जनतेच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून समाजातील प्रत्येक घटक विकसित झाला पाहिजे. यासाठी आग्रही असल्याचे गणेश अहिरे यांनी यावेळी बोलून दाखवले. जिल्हा परिषद गटातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधताना आपापल्या गावांना गरज असणाऱ्या विकास कामांना प्राधान्य देऊन सर्वांगीण विकास करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गावातील विकास कामांचे प्राधान्य ठरवून त्याच्या साठी किती निधी खर्च होणार, कोणत्या गावात कोणत्या कामाची गरज आहे व विविध योजनेतून मिळणाऱ्या निधीतून गावाची उपलब्ध स्थिती काय आहे, याची नोंद घेऊन गावाचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून ,अपेक्षित कामांचे प्रस्ताव तात्काळ तयार करून ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांच्याकडे देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना दिल्या. ग्रामसेवक हा ग्रामविकासाच्या वाटेवरील महत्त्वाचा दुवा असून त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करावेत असे आवाहन ही गणेश आहिरे यांनी ग्रामसेवकांना केले.

या आढावा बैठकीत  विविध गावांच्या  सरपंचांनी गणेश आहिरे यांना विविध प्रश्न विचारात  गाव विकासासंदर्भात सूचना केल्या. तर काहींनी ठेकेदारी पद्धतीने होणाऱ्या कामांविषयी चिंता व्यक्त करत ,पुढील कामे ग्रामपंचायतीमार्फतच करावित असे सांगितले. त्यास उत्तर देताना गणेश आहिरे यांनी सांगितले की, पहिले ही कामे ग्रामपंचायतीमार्फत होत होती. परंतु आज जिल्हा परिषदेत सर्वात जास्त तक्रारी त्यात कामांच्या आलेले आहेत. तरीही आपण आत्ताची काही कामे ग्रामपंचायतीवर देऊन त्यात जी ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करून घेईल. त्या ग्रामपंचायतीना  पुढील कामे न सांगता मिळत राहतील असे सांगितले. यावेळी केळझर ,वाठोडा ,घुलमाल, साळवण साल्हेर  या ग्रामपंचायती तर्फे जानेवारी -फेब्रुवारीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते त्याविषयी चिंता व्यक्त करत, तात्काळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्राधान्य देऊन शीघ्र गतीने त्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
दरम्यान युवा मराठा न्युजने जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांचेकडे केळझर,वाठोडा,वगरीपाडा,सावरपाडा येथील समस्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्याने त्याची फलश्रुती या आढावा बैठकी निमिताने दिसून आली.
यावेळी विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी प्रत्येक ग्रामनिहाय ग्रामसेवकांकडून विविध चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय हवेत अशा सूचनाही केल्या. तसेच विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना निधी देण्यात येऊनही यांच्याकडून हा निधी खर्च न होता जशाचे तसा पडून असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असून निधी अखर्चित ठेवणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई होऊन त्या ग्रामपंचायतीची वेगळी नोंद ठेवली जाईल असे ग्रामसेवकांना मार्गदर्शनात सांगितले.

यावेळी शिवदास आहिरे, देवराम टोपले, दिलीप शिंदे, सत्यसिंग मोरे, मधुकर भोये. संजय चौरे, बाबुराव बागुल, दत्तू बागुल यांचे समवेत पठावे दिगर गटातील सर्व सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

Previous article
Next articleपिक पाहाणी व शेत शिवार कार्यक्रम खासदार चिखलीकर यानी केला नायगांव व बिलोली तालुक्यात दौरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here