*युवा मराठा न्युजच्या दणक्यानंतर आज होणार कौळाणे व-हाणे ग्रामपंचायतीची चौकशी*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* युवा मराठा न्युजने उठविलेल्या आवाजामुळे व दि.१२आँक्टोबर पासून दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशारा आंदोलनाचा परिणाम म्हणून आज दिनांक ७आँक्टोबर बुधवार रोजी कौळाणे (निं.) व व-हाणे गावाच्या कामगिरीची दप्तर तपासणी होणार असल्याचे खात्रीलायक वृत समोर आले आहे.
कौळाणे (निं.)येथील तत्कालीन ग्रामसेवक संजीव घोंगडे व तत्कालीन सरपंच सौ.लताबाई बच्छाव यांनी आपणास नसालेल्या पदाचा बेकादेशीरपणे दुरुपयोग करुन पत्रकार भवनच्या नावाखाली केलेल्या फसवणूकीचा व गावात झालेल्या विकास कामांचा सखोल आढावा घेण्यात येऊन चौकशी केली जाणार आहे,
तर व-हाणे,ता.मालेगांव येथील पत्रकार निवासस्थान व भवनप्रश्नी अडवणूक करुन शासनाच्या परिपत्रकाला आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्राला कुठलीही किंमत किंवा महत्त्व न देणाऱ्या व-हाणे ता.मालेगांव येथील ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्या कारकिर्दीतील झालेल्या विकास कामांची व उपोषणातून करण्यात आलेल्या इतर मागण्यांची चौकशीही यावेळी होणार आहे.सदरच्या चौकशीतून न्याय न मिळाल्यास हे प्रकरण महाराष्ट्राचे लोकआयुक्त व राज्यपाल यांचेकडे नेण्यात येणार असल्याची माहिती युवा मराठा न्युज परिवाराच्या वतीने मुख्य संपादक /सी.ई.ओ.राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली आहे.