• Home
  • 🛑 शिवसेना वचननामा म्हणजे जनतेची फसवणूक :- “आप” ची पोलिसांत तक्रार 🛑

🛑 शिवसेना वचननामा म्हणजे जनतेची फसवणूक :- “आप” ची पोलिसांत तक्रार 🛑

🛑 शिवसेना वचननामा म्हणजे जनतेची फसवणूक :- “आप” ची पोलिसांत तक्रार 🛑
✍️ अकोला 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अकोला :⭕ विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) काही वचन दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. या अत्यंत महत्वाच्या आश्वासनाचा प्रचार त्यांनी व्हिडीओ, पत्रके, भाषणे, ट्विटर अश्या विविध माध्यमातून केला होता. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले.

यामुळे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर यांनी राज्यातील जनतेला दिलेली वचने पाळणे यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे.

या उलट देशात आणि राज्यात महामारीचे संकट असतांना १ एप्रिलपासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे. तसेच रु ३ प्रति युनिट प्रमाणे तयार होणारी विज रु १५ प्रमाणे देवून जनतेची लूट चालू आहे. फसवले गेलेल्या जनतेला घेऊन आम आदमी पार्टीने वीजबिल माफी व किमान वीजदर कपातीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यासाठी सोशल मिडिया वरून मागणी, निदर्शने, इमेल पत्र व पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे वीजबिल माफ करण्याचे वा दरकपातीसाठी हजारो अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिले आहेत.

ही जनतेची फसवणूक ठरते.याच पद्धतीने जर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ती वा संस्थेवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. अशाच प्रकारचे आमिष दाखवून ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत व आता जाणीवपूर्वक आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारीच्या संकट काळी विजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी केली आहे.

त्यामुळे महामारीच्या संकटामुळे पिडीत आणि फसवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे राज्यभरात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही पोलिस तक्रार अकोला येथे पश्चिम विदर्भ संयोजक शेख अन्सार यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलिस स्टेशन आणि खदान पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

या वेळी आम आदमी पार्टी अकोला जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, शहर संयोजक डॉ खंडेराव दाभाडे, कोषाध्यक्ष अब्दुल रफीक, सहसचिव काझी लायक अली, सदस्य दिलीप पाटील, शेख रशीद शेख रफुल, व सुरेश सावंत आदी उपस्थित होते….⭕

anews Banner

Leave A Comment