*वडगांव शहर शिवसेनेच्या वतीने मोफत कँम्पचे आयोजन*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव मधील शिवसेना शहर प्रमुख मा.संदिप पाटील( बाबा) नगरसेवक
यांच्या वतीने वडगांव व परिसरातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत मिळणारी शिष्युवृत्ती पूर्वी बँकेत जमा केली जात होती.
शासनाने बंद करून ती आता पोस्टामधे जमा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी पोस्टामधे खाते काढण्यासाठी कोरोनाच्या , वाढत्या प्रादुर्भामुळे शक्य नसल्याने,
व विद्यार्थ्यांचा वेळ वाचून जलद खाते उघडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महालक्ष्मी मंगलधाम येथे मोफत कँम्पचे आयोजन केल्याने वडगांव व परिसरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
आज या कँम्पला भेट देण्यासाठी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे नगरसेविका (वनपा) सुनिता पोळ नगरसेविका (वनपा) यांनी भेट देऊन
विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे सोय करून अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख मा.संदिप पाटील यांचे आभिनंदन व कौतुक करून विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.
तसेच या कँम्पला आत्ता पर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे , व अजून घेत आहेत.
तसेच या कँम्पला पोस्टाचे अधिकारी यासिन पुजारी व सहकारी , यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख संदिप पाटील नगरसेवक , भूषण सालकर शिवसेना उपशहर प्रमुख , बबलु खाटीक ग्राहक सेना शहर प्रमुख , शिवराज मुसळे ग्राहक सेना उपशहर प्रमुख , मिलींद हंजे , भालचंद्र कोळी , रोहन सुनगार ,
आणि शेकडो विद्यार्थी , पालक सोशलडिस्टन राखून या मोफत कँम्पचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.