• Home
  • 🛑 महापौर किशोरी पेडणेकरांनी ….! मुंबईकरांन समोर जोडले हात 🛑

🛑 महापौर किशोरी पेडणेकरांनी ….! मुंबईकरांन समोर जोडले हात 🛑

🛑 महापौर किशोरी पेडणेकरांनी ….! मुंबईकरांन समोर जोडले हात 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं होतं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अशातच महापौरांचा एक व्हिडीयो समोर आला आहे.

सोशल मिडीयावर मुंबई महापौरांचा हा व्हिडीयो असून यामध्ये त्यांनी मुंबईकरांना आवाहन केलं आहे. घराबाहेर पडताना मास्क लावा असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

या व्हिडीयोमध्ये महापौर म्हणतात, ‘सर्व मुंबईकरांना मी पुन्हा पुन्हा सांगतेय की, मास्क न लावता घराबाहेर पडू नका. मास्क न लावणाऱ्या लोकांकडून पैसे वसूल करणं हा उद्देश नसून तुम्ही सुरक्षित राहणं हा खरा उद्देश आहे.

त्यामुळे बाजारात जाताना किंवा घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावं. याचं विनंतीसाठी तुम्हाला विनंती करतेय.’

मुंबईकरांना ही विनंती करताना महापौरांनी हात जोडले. शिवाय ‘मास्क लावा तरंच घराबाहेर पडा’ असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे….⭕

anews Banner

Leave A Comment