• Home
  • 🛑 *कोरोना रोखण्यासाठी …..! रद्दीवर सॅनिटायझर* 🛑

🛑 *कोरोना रोखण्यासाठी …..! रद्दीवर सॅनिटायझर* 🛑

🛑 *कोरोना रोखण्यासाठी …..! रद्दीवर सॅनिटायझर* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

येरवडा :⭕वर्तमानपत्राच्या रद्दी खरेदी-विक्री करताना कोरोना संसर्गाचा धोक्का टाळला जातो.परंतू प्रत्येक व्यापार्‍यांनी रद्दी घेतना सॅनिटायझर करणे गरजेचे आहे. तरच स्वत:चा जीव वाचू शकतो असे मत चोरडीया रद्दी डेपोचे मालक पारसमल चोरडीया यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व उद्योग सध्या मंद गतीने चालू आहेत.बरेच छोटे व्यावसायिक स्वत:चा जीव धोक्यात घालून रद्दी खरेदी-विक्रीचे काम करत आहेत. येरवडा नवी खडकी येथील पारसमल मोहनलाल चोरडीया हे गेल्या चाळीस वर्षापासून रद्दी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत.

परंतू गेल्या सहा महिन्या पासून कोरोनच्या लॉकडाऊन मुळे रद्दी व्यवसाय बंद असल्याने कुटुंबात अडचणी आल्या.मात्र न डगमगता पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे. स्वत:चे कुटुंब व ग्राहकाची काळजी घेण्यासाठी रद्दीच्या प्रत्येक पानावर सॅनिटायझर करून रद्दी खरेदी विक्री करत आहेत. रद्दीवर सॅनिटायझर केल्याने लोकांना कोरोनाची लागण होणार नाही म्हणून हा उपक्रम राबविला आहे.हा उपक्रम राबविणारे पुण्यातील पहिली व्यापारी आहेत.

पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक उद्योगातील व्यक्तीने चोरडीया यांच्या आदर्श घेऊन व्यवसाय सॅनिटाझरचा वापर केल्याने धोका टाळता येतो.

पारसमल चोरडीया म्हणाले की. गेल्या चाळीस वर्षा पासून मी व माझी पत्नी रद्दीचा व्यवसाय करत आहोत.हाच उद्योग करत मुलांना उच्चशिक्षित केले आहे.कोणताच उद्योग हा कमीपणा असणारा किंवा छोटा नसतो.

तुम्ही ग्राहकांची कशी काळजी घेता यावर अवलंबून असतो.सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकांनी प्रत्येकाची काळजी घेणे म्हणजेच देश सेवा होई्रल.कोरोना ही जागतिक संकट आहे.याला सर्वांनी सामोरे जाऊन कोरोना हरविले पाहिजे.⭕

anews Banner

Leave A Comment