*युवा मराठा न्युजमुळे आदिवासी बांधवाना मिळाला अखेर न्याय*
*देवळा,(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-*
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या तिसगांव गावाजवळील श्रावणदेव वस्तीवर आज सकाळी एका आदिवासी इसमाचा मृत्यू झाल्याने,त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नातून वाद निर्माण झाल्याने व शेतकऱ्यांनी अंत्यविधी करु देणार नाही असा पावित्रा घेतल्याने,शेतकऱ्यामध्ये व आदिवासी बांधवामध्ये किरकोळ स्वरुपाचा शाब्दीक वाद झाला व धक्काबुक्कीची घटना घडली.
त्यामुळे श्रावणदेव वस्तीवरील आदिवासी बांधवानी युवा मराठा न्युजशी दुरध्वनीवरुन संपर्क साधल्याने,युवा मराठा न्युजच्या ब्युरो टिमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचे गांभिर्य पाहून संबंधित शेतकऱ्याशी चर्चा केली.यावेळी देवळ्याचे तहसीलदार दतात्रय शेजूळ यांचेशी युवा मराठा न्युजने दुरध्वनीवरुन संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली.अखेर सकाळी साडेदहा वाजेपासून रखडत पडलेल्या आदिवासी इसमाच्या मृतदेहावर युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या प्रयत्नामुळे आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले,त्यामुळे श्रावणदेव आदिवासी वस्तीवरील आदिवासी बांधवानी युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचे भरभरुन कौतुक करुन अभिनंदन केले.वास्तविक तिसगांवच्या श्रावणदेव आदिवासी वस्तीवर सकाळी साडेदहा वाजल्यापासून आदिवासी इसमाच्या मृतदेहाची होत असलेली हेळसांड थांबवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिसगांवातील एकही पुढारी किंवा ग्रामपंचायतचे कुणीही पुढे आले नाहीत.त्यामुळे आदिवासी बांधवात तीव्र संतापाची भावना बघावयास मिळाली.