*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट।*
नाशिक,(विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्रक)- शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२०ची संध्याकाळ निसर्गरम्य अशा नाशिकचे काश्मीर, पावसाचे माहेरघर इगतपुरी येथे नेचर्स पॅराडाईज या प्रोजेक्टला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. खासदार श्री. संभाजीमहाराज भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संजय खताळे, शंतनू देशपांडे, सचिन खताळे, अँड. विनोद साळुंके, अविनाश वाळुंजे यांनी सुरू असलेल्या नेचर्स पॅराडाईज या प्रकल्पाची आणि इगतपुरी फोरमचे सुरू असलेले कार्य याची माहिती महाराजांना दिली.
महाराजांनी आपल्या अनेक आठवणी सर्वांना सांगितल्या. रायगडावर सुरू असलेल्या कामाची सर्वांना माहिती दिली.
महाराजांचे निसर्गप्रेम, पर्यटनाची आवड, पर्यटन वाढीसाठी सुरू असलेले कार्य, अनेक नवीन -जुन्या झाडांची माहिती त्यांच्या बोलण्यातून जाणवली. महाराजांनी त्यांनी काढलेले कोल्हापूर येथील निसर्गाचे फोटो, व्हिडिओ सर्वांना दाखविले आणि त्याची इत्यंभूत माहिती दिली. कधीही गरज पडल्यास मी उपलब्ध असेन अशी ग्वाही महाराजांनी दिली.
यावेळी महाराजांचे स्वागत करताना श्री. संजय खताळे, शंतनू देशपांडे, विनायक पाटील, विनोद साळुंखे, संजय शिंदे, सचिन खताळे, करण गायकर, गणेश कदम, सोमनाथ सोनार, अविनाश वाळुंजे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता.
Home Breaking News *इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट