Home Breaking News 🛑 पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे...

🛑 पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले 🛑

89
0

🛑 पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕ :- पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 97 हजार 552 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 412 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 5 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 45 हजार 41 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 291 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 334 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.04 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 714 रुग्णांपैकी 5 हजार 707 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 701 आहे. कोरोनाबाधित एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 765 रुग्णांपैकी 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 725 आहे. कोरोनाबाधित एकूण 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 441 रुग्णांपैकी 4 हजार 458 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 674 आहे. कोरोनाबाधित एकूण 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 591 रुग्णांपैकी 10 हजार 66 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 978 आहे. कोरोनाबाधित एकूण 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 197 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 580, सातारा जिल्ह्यात 345, सोलापूर जिल्ह्यात 271, सांगली जिल्ह्यात 146 तर कोल्हापूर जिल्ह्यात 855 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 24 हजार 574 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 97 हजार 552 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 23 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
⭕❗⭕❗⭕❗⭕❗

Previous article🛑 कोकणात गणेशोत्सवाला गालबोट….! बाप्पाला निरोप देताना ३ जण बुडाले 🛑
Next article🛑 जंबो हॉस्पिटलचे अजितदादा पवार यांनी केले उदघाटन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here