• Home
  • आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्याकडे खासदार धैर्यशील मानेंची विविध समस्याबाबत केली मागणी .*

आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्याकडे खासदार धैर्यशील मानेंची विविध समस्याबाबत केली मागणी .*

*आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांच्याकडे खासदार धैर्यशील मानेंची विविध समस्याबाबत केली मागणी .*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शासकीय रूग्णालयातील समस्या सोडवून कोरोना बाधित रूग्णांना लवकरात लवकर उपचार करता यावेत यासाठी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार मा.धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध समस्या बाबत चर्चा केली
यावेळी हुपरी व परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी हुपरी येथे ग्रामीण रुग्णालय होणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे तो त्वरित मंजूर करून हुपरी येथे ग्रामिण रुग्णालय उभा करावे तसेच .
कोडोली ता पन्हाळा येथील ५०बेड असलेल्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय व अवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. या रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती तात्काळ करून घ्यावी व रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर, मल्टीप्यारा, पल्स ऑक्सीमिटर, ओटु सेंटर या सुविधा सुरू कराव्यात.
इंदिरा गांधी सामान्य उपजिल्हा रुग्णालय इचलकरंजी IGM, इचलकरंजी येथील ४२ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागामध्ये समायोजन करा ह्या विविध मागण्या हातकणंगले तालुक्याचे खासदार मा.धैर्यशील माने यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्याआहेत.
खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावीन असे यावेळी आरोग्यमंत्री मा.ना.राजेशजी टोपे यांनी खासदार धैर्यशील माने यांना आश्वासन दिले.

anews Banner

Leave A Comment