*यशवंत धर्मार्थ रूग्णालयाच्या वतीने शंभर बेडचे अद्यावत कोविड रूग्णालय सुरू.*
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)
सद्या देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वाढत्या कोरोना रूग्णाच्या संख्येच्या विचारात घेता जिल्ह्यात कोरोना रूग्णांना उपचार करणेसाठी रूग्णालये अपुरे पडत आहेत.
पन्हाळा तालुक्यात कोविड रूग्णालयात उपलब्ध नसल्याने परिसरातील रूग्णांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होतअसल्याने कोडोली(ता.पन्हाळा) येथिल यशवंत धर्मात रूग्णालयाच्या वतिने नविन अद्यावत शंभर बेडचे डेडीकेटेड कोविड रूग्णालय सुरू करत आहेत.
या रूग्णालयात आयुर्वेदीय व अँलोपँथी अशा दोन्ही प्रकारच्या औषध उपचार होणार आहे.
या मध्ये आँक्सिजनची सुविधा असलेले तिस व माँनिटर सुविधेचे पाच बेड्स उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या व एन बी ए एच च्या नियमानुसार सुविधा उपलब्ध असनार आहेत .
या रूग्णालयाचा शुभांरभ उद्या गुरूवार दिनांक १२ आँगस्ट रोजी राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डाँ.जयंत पाटील ,यानी माहीत दिली तसेच रूग्णालयाच्या शुभारंभास कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई , जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, उप विभागीय अधिकार अमित माळी , तहसिलदार ,
सरपंच ,कोडोली पोलिस ठाण्याचे अधिकारी आयुर्वेदीक महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.मिलींद गोडबोले, डाँ.सुर्यकिरण राव , डाँ.अभिजीत इंगवले , डाँ. हर्षल साबळे उपस्थित असणार आहेत.