Home Breaking News नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांनी दोन किलो सोन्याच्या संशयावरुन युवकांचे केले अपहरण ; पोलिस...

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांनी दोन किलो सोन्याच्या संशयावरुन युवकांचे केले अपहरण ; पोलिस अधीक्षक मगर –

119
0

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारांनी दोन किलो सोन्याच्या संशयावरुन युवकांचे केले अपहरण ; पोलिस अधीक्षक मगर –

नांदेड, दि. ९ ; राजेश एन भांगे

अपहरण करण्यात आलेल्या युवकांच्या घरात दोन किलो सोने असल्याचा संशय असल्याने त्यांना पळवून नेल्याची कबुली पोलिस चकमकीत गंभीर जखमी झालेल्या अट्टल आरोपी विकास हटकर याने दिली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जीवंत काडतुस जप्त केले. त्याचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांनाही लवकरच पकडण्यात येईल. विशेष म्हणजे दोन्ही युवकांचे प्राण वाचवून स्वत: सुरक्षीत राहून पोलिसांची कारवाई अभिनंदनीय असल्याचे सांगितले. तसेच या आरोपींवर महाराष्ट्र सामुहीक गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) लावण्याचा प्रस्ताव दाखल करुन त्या दिशेने आम्ही पावले उचलली असल्याचे पोलिस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोहा शहरातील दोन गुन्हेगार व विकास हटकर हा कारागृहात असतांना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यातून एकमेकांच्या परिसरातील माहिती त्यांनी घेतली. यावेळी लोहा येथील गुन्हेगारांनी जमुनाबाई गिरी हिच्याकडे दोन किलो सोने असल्याचे विकास हटकरला सांगितले. हे त्याने लक्षात ठेवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकास हटकर याची जामिनावर सुटका झाली. यावेळी त्याने लोहा शहरात भ्रमंती वाढविली. बुधवारी (ता. पाच) आॅगस्ट रोजी पिडीत बालक हा आपल्या भावासोबत घराशेजारी असलेल्या गिरणीवर दळण घेऊन गेला होता. त्यांच्या मागवार असलेल्या विकास हटकर याने या दोघांनाही आपल्या स्कार्पिओ गाडीत बसवून नांदेडला आणले. अपहरण केलेल्या युवकाच्या मोबाईलवरुन त्याच्या आईला वीस लाखाची खंडणी मागितली. पैसे नाही दिले तर तुझ्या मुलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. यानंतर जमुनाबाई हिने लोहा पोलिस ठाण्यात जावून मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. विकास हटकर याच्याकडील स्कार्पिओ गाडी ही विक्की चव्हाण याच्या खून प्रकरणात वापरली आहे का याची फाॅरेन्सीक लॅबकडून चौकशी सुरु असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले.

लोहा येथील शुभम गीरीव त्याच्या भावाचे केले होते अपहरण

शुभम व त्याच्या भावाचे अपहरण करणारा विष्णुपूरी (ता. नांदेड) येथील अट्टल गुन्हेगार विकास हटकर हा असल्याची खात्री पोलिसांना पटली. मोबाईल सीडीआरवरुन व त्याने केलेल्या फोन वरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. अपहरण केलेल्या युवकाला घेऊन तो नांदेडच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेव नगर भागात एका घरात दडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक श्री विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गुप्त माहिती काढून निळा रस्त्यावर सापळा लावला. यावेळी त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, पांडूरंग भारती यांच्या पथकाला बोलावून घेतले. पोलिस दिसताच विकास हटकर हा त्या दोन्ही मुलांना घेऊन सोयबाीनच्या शेतातून पळत सुटला. यावेळी पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी क्षणांचाही विलंब न लावता विकास हटकर याच्या पायावर आपल्या शासकिय पिस्तुलातून गोळी झाडली. यात तो जखमी झाला. त्याच्या तावडीतून दोन्ही बालकांचा जीव वाचविला.

पथकाला २५ हजाराचे बक्षिस जाहीर

जखमी विकास हटकर याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरा त्याच्या ताब्यातून सुटका करुन घेतलेल्या मुलांना त्याच्या आईच्या स्वाधीन केले. सदर महिला ही आपल्या दोन्ही मुलांना घेऊन ती बालाजीनगर परसिरात पालामध्ये राहते. परंतु तेथील गुन्हेगारांच्या चुकीच्या माहितीवरुन तीच्या दोन्ही मुलांचे अपहरण करण्यात आले होते. परंतु पोलिसांच्या तत्परतेने त्या दोन्ही मुलांचे प्राण वाचले. या पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामिण) बाळासाहेब देशमुख, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती. पथकाला २५ हजार रुपयाचे बक्षिस जाहीर केले असून विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कडूनही त्यांना पारितोषक मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा पोलिसाधिक्षक श्री. मगर यांनी सांगितले.

Previous articleदुकानदार व कामगार, भाजी विक्रेते यांचीही कोविड १९ चाचणी करा ; केंद्राचे राज्यांना आदेश –
Next article*अखेर कर्नाटक सरकार आलं* *भानावर, शिवाजी महाराजांचा पुतळा* *पुन्हा बसवणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here