• Home
  • 🛑 असा अडकला भारताचा रिटेल किंग; शेअर गहाण ठेवून कर्ज काढले.🛑

🛑 असा अडकला भारताचा रिटेल किंग; शेअर गहाण ठेवून कर्ज काढले.🛑

🛑 असा अडकला भारताचा रिटेल किंग; शेअर गहाण ठेवून कर्ज काढले.🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 9 ऑगस्ट : ⭕ किशोर बियानी यांची ओळख भारताचा रिटेल किंग अशी केली जाते. पण बियानी यांचे सामाज्य आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. रिलायन्सकडून २३ हजार कोटींना बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपचे अधिग्रहण केले जाऊ शकते. बिग बाजार, FBB आणि ईजीडे सारखे ब्रँडच्या माध्यमातून देशभर पोहोचलेल्या किशोर बियानी यांच्या कंपनीवर सध्या १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज आहे. इतक नव्हे तर बियानी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कंपनीतील हिस्सा गहाण ठेवला गेलाय. जाणून घेऊयात कर्जाच्या संकटात कसे अडकत गेले किशोर बियानी…

बियानी यांनी बिग बाजारची सुरुवात सबसे सस्ता, सबसे अच्छा या टॅगलाइनवर केली होती. बिग बाजारने एके काळी देशात अव्वल स्थान मिळवले होते. पण काही वर्षात रिटेल इंडस्ट्रीमधील हा सर्वात मोठा ब्रँड संकटात आला. बिग बाजारने रिटेल स्टोअरमध्ये सुरुवातीच्या काळात चांगला व्यवसाय केला होता. मात्र गेल्या काही वर्षात मंदीमुळे ग्राहकांची आवड बदलली. ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल्समधील खरेदीबाबत पहिल्या सारखा ग्राहकांचा कल राहिला नाही. यामुळे फ्युचर ग्रुपला झटका बसला. एका बाजूला कंपनीचा व्यवसाय कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला कर्ज वाढत गेले. यामुळे बियानी यांचे बिग बाजार कर्जाच्या सापळ्यात अडकले. त्यानंतर करोना काळ फ्युचर ग्रुपसाठी मोठे संकट घेऊन आले.

डिसेंबर २०१९ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १५ टक्के घट झाली होती. याशिवाय महसूलात ३ टक्के घट झाली. त्यानंतर करोना संकटाने या समस्येने अधिक गंभीर रुप घेतले. रेटिंग एजेंसी ICRAने मार्च २०२० मध्ये फ्युचर ग्रुपचे रेटिंग नकारात्मक केले. कंपनीच्या कर्जात सातत्याने वाढ होत आहे. मार्च २०१९मध्ये १० हजार ९५१ कोटी असलेले कर्ज सप्टेंबर २०१९ पर्यंत १२ हजार ७७८ कोटीवर गेल्याचे ICRA म्हटले होते.

किशोर बियानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीतील ३३.५ टक्के हिस्सा गहाण ठेवला आहे. एक बाजूला कंपनीचा व्यवसाय कमी होत आहे, दुसऱ्या बाजूला कर्ज वाढत असताना शेअर गहाण ठेवल्याने संकट इतके मोठे झाले की फ्युचर ग्रुपची विक्री करण्याची वेळ आली. आता याची खरेदी रिलायन्स ग्रुप करणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

रिलायन्स २३ हजार कोटी रुपयांना फ्युचर ग्रुप विकत घेऊ शकते. त्यानंतर बिग बाजार, FBB आणि अन्य नाव आहे तशीच राहण्याची शक्यता आहे. रिलायन्सच्या मते या ब्रॅडनी इतकी वर्ष बाजारात नाव कमावले आहे आणि व्यवसाय केला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment