• Home
  • 🛑 **नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन; महिनाभरात राष्ट्रवादीने दुसरा नगरसेवक गमावला* 🛑

🛑 **नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन; महिनाभरात राष्ट्रवादीने दुसरा नगरसेवक गमावला* 🛑

🛑 **नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन; महिनाभरात राष्ट्रवादीने दुसरा नगरसेवक गमावला* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी:-⭕ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे‌ कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ता साने यांच्यानंतर जावेद शेख यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महिनाभरात आणखी एक नगरसेवक गमावला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक असलेल्या जावेद शेख यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती.

त्यांच्यावर सुरुवातीला आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 21 जुलैपासून त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांच्या प्लाज्मा थेरपीचाही वापर करण्यात आला होता.

मात्र निमोनियाही झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. सातत्याने खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती.

जावेद शेख यांच्या लढवय्या वृत्तीमुळे ते करोनावर मात करतील, असे सांगण्यात येत होते.

मात्र, त्यांची कोरोनाविरोधातील लढाई शुक्रवारी पाचच्या सुमारास संपुष्टात आली. त्यांना पाच वाजता मृत घोषित करण्यात आले. जावेद शेख यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे….⭕

anews Banner

Leave A Comment