• Home
  • 🛑 बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप 🛑

🛑 बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप 🛑

🛑 बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 29 जुलै : ⭕ बॉलिवूड पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले आहे. 2020 वर्षात बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. 115 सिनेमांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून आजाराशी झूंज देत असलेल्या या अभिनेत्रीचे आज निधन झाले. कुमकुम यांनी प्रसिद्ध अभिनेते गुरु दत्त आणि किशोर कुमार यांच्या बरोबर काम केले होते. मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, एक सपेरा एक लुटैरा यांसारख्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. नावेद जाफरी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.

नावेद जाफरी याने त्याच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आपण आणखी एक मौल्यवान हिरा गमावला आहे. मी बालपणापासून यांना ओळखतो. त्या आमच्यासाठी कुटूंबातीलच होत्या. त्या कमालीच्या कलाकार आणि एक चांगली व्यक्ती होत्या. तुमच्या आत्म्यास शांती लाभो कुमकुम आंटी’.

गेल्या काही दिवसांपासून कुमकुम या आजारी होत्या. मुंबईमध्ये लिकिंग रोडवर त्यांचा बंगला होता. ज्याचे नावच कुमकुम असे ठेवण्यात आले होते. पुढे तो बंगला तोडून तिथे इमारत बांधण्यात आला. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबतची कुमकुम यांनी काम केले आहे. मिस्टर एक्स इन बॉम्बे (१९६४), मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा यांसारख्या चित्रपटांमध्ये कुमकुम यांना प्रेक्षकांनी पाहिले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment