• Home
  • 🛑 पुरंदरच्या तहापासून राखीव ठेवलेला कोरीगड 🛑

🛑 पुरंदरच्या तहापासून राखीव ठेवलेला कोरीगड 🛑

🛑 पुरंदरच्या तहापासून राखीव ठेवलेला कोरीगड 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

ऐतिहासिक बातमी :⭕कोरिगडास ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे, कोरिगडावर जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा प्रथम गाठावे लागेल

लोणावल्यातून 25 km वरती असलेला हा कोरीगड गाठण्यासाठी तुम्हाला पेठ शहापूर गाव पकडावे लागते , पेठ शहापूर गावाच्या बस स्टँड नजीक हनुमान मंदिर आहे तिथे आपल्या गाड्या पार्किंग आणि जेवणाची सोय होऊ शकते .

आपले पाठीवरले ओझे पार्किंग ठिकाणी ठेऊन किल्ल्याच्या दिशेने पुढे सारकताच एक सिमेंटची विहीर दिसेल विहिरीपुढे आल्यावर एक घासारीची पायमळणी वाट समोर दिसते ती वाट आपल्याला गडावर नेते.
20 मिनिटे चालत गेल्यावर झाडाझुडपातून बाहेर गेल्यावर समोर सह्याद्री प्रतिष्ठानचा ऐतिहासिक फलक आणि गडाच्या बांधीव पायऱ्या समोर येतात , पुढे दहा मिनिटे पायऱ्या चढत गेल्यावर उजव्या हातास एक गणेश मंदिर आणि गुहा नजरेस पडते , गुहेत एक टाके ही आहे पण पाणी पिण्या योग्य नाही .

आपण गणरायाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर अतिशय सुंदर असा गणेश दरवाजा आपले स्वागत करतो याच दरवाज्यास सह्याद्री प्रतिष्ठान कडून भक्कम असा दरवाजा आणि गडावरील तोफेस तोफगाडे देण्यात आले आहेत .

कोरिगडाचा घेर खूप विस्तृत आणि मोठा आहे , दरवाज्यातून वरती जाताच समोर महादेव मंदिर आणि दोन तलाव दिसतात पावसाळ्यात एका तलावाचे पाणी गडाच्या कड्यातून खाली जाण्याऐवजी वरती वाऱ्याने फेकले जाते हे पाहण्यासाठी वारे आणि पावसाचाही जोर खूप लागतो , महादेव मंदिरासमोर चार तोफा तोफगाड्यासह गडाचे ऐतिहासिक महत्त्व आपल्याला जाणून देतात .

कोरिगडाची तटबंदी अतिशय भक्कम असून एक हनुमान मंदिर समोर काही शिळा पुढे आपण कोरिगडाच्या दक्षिणेस गेल्यावर कोराई देवीचे मंदिर समोर दिसते मंदिरासमोर दीपमाळ ही आहे , मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रसंनवदनी आहे .

मंदिरामागेच गडावरील मोठी लक्ष्मी नावाची तोफ लोखंडी अंगलवर दिसते , गडावर तीन लहान गुहा आणि टाके ही आहेत आणि कोरिगडाच्या दुसऱ्या बाजूस ही एखादा दरवाजा असावा तिथे पडीक अवशेष आणि खलील बाजूस गडाची भक्कम तटबंदी ही दिसते .

⭕ गडाचा इतिहास ⭕

हा गड कोणी बांधला याचे संदर्भ मिळत नसले तरी बहामनी काळापासून ते शिवकाळात ही महत्वपूर्ण नोंदी मिळतात .
बहामनी काळ, निजामशाही , आदिलशाही , मोगलशाही मराठेशाही अनेक पातशाह्या या किल्ल्यावर आपले अधिराज्य गाजवत होत्या पण शिवकाळात ह्या किल्ल्याला अधिक महत्व प्राप्त झाले , शिवछत्रपतींनी लोहगड विसापूर तुंग , तिकोना , आणि कोरीगड हे 1657 साली स्वराज्यात दाखल करून घेतले .

मिर्झाराजे जयसिंग बरोबर जो पुरंदरचा प्रसिद्ध तह झाला ज्यात 23 किल्ले औरंगजेबाला दिले आणि जे बारा किल्ले शिवछत्रपतींनी आपल्या जवळ ठेवले त्यात कोरीगड ही होता .

1671 च्या पत्रात या गडासाठी तीन हजार होणं महाराजांनी राखीव ठेवले होते याची नोंद ही मिळते , पुढे शिवशंभू काळानंतर राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत औरंगजेबाने हा कोट घेतला असावा आणि पुढे लगेच मराठ्यांनी परत हा गड घेतला होता .

1713 ला हा गड कानोजी आंग्रे यांचे कडे होता पुढे 1714 ला शाहू महाराजांनी आंग्रेंसोबत तह करून हा गड साम्राज्यात सामील झाला .

पुढे 1818 पर्यंत हा गड मराठेशाहित होता इंग्रजांच्या हल्ल्याने तीन दिवसांच्या तोफांच्या माऱ्याने गडावरील दारुकोठर उडाल्याने मावळ्यांनी हा गड इंग्रज अधिकारी प्रोर्थर यास स्वाधीन केला .

असा कोरीगडचा दैदिप्यमान इतिहास आणि गड आपण एका दिवसात पाहून जवळच असलेले मोरगिरी आणि तुंग किल्ल्यांकडे आपल्या वेळेनुसार प्रस्थान करू शकता ….⭕

anews Banner

Leave A Comment