Home Breaking News 🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑

🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑

106
0

🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 26 जुलै : ⭕ कोरोनाचे वाढते संक्रमण आणि लॉकडाऊनमध्ये आर्थिक समस्या कमी करण्यासाठी येस बँकेने (Yes Bank) त्यांच्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. बँकेने इन्संट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या WhatsApp वर ग्राहकांसाठी बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. ग्राहकांच्या मदतीसाठी ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे. बँकेचा असा दावा आहे की, 60 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आणि सेवा WhatApp वर उपलब्ध असतील आणि ज्यामुळे ग्राहकांना काँटॅक्टलेस सेवा मिळेल. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार सोपे करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

⭕ कोणत्या सेवा WhatApp वर मिळणार?

➡️ या सविधेअंतर्गत येस बँकेचे ग्राहक एक मेसेज करून त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतात.

➡️ काही कालावधीमध्ये केलेले व्यवहार, डिजिटल बँकिंग प्रोडक्ट्स देखील ग्राहक पाहू शकतील.

➡️ त्याचप्रमाणे एफडीवर लोन घेऊ शकतील आणि चेक बुक देखील ऑर्डर करता येईल. ग्राहकांना या माध्यमातून अवैध व्यवहाराबाबत तक्रार देखील नोंदवता येईल.

➡️ 60 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आणि सेवांसाठी या माध्यमातून अर्ज देखील करता येईल.

➡️ या माध्यमातून पीएम केअर फंडमध्ये पैसे देखील जमा करता येतील.

➡️ तुम्हाला जर जवळपासच्या एटीएम ऑफिसचा किंवा बँक शाखेचा पत्ता हवा असेल, तर ते देखील या सेवेतून मिळवणे शक्य आहे.

येस बँकेच्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा सुरू करुन घेण्यासाठी +91-829-120-1200 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला ही सेव्हा सुरु करण्यासाठी एका लिंकसह एसएमएस येईल. +91-829-120-1200 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करून या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज करा.

या व्यवहाराच्या सुरक्षेबाबातही बँक विशेष सक्रिय आहे. यामध्ये केले जाणारे मेसेज एंड टु एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असतील असा दावा बँकेने केला आहे. त्याचप्रमाणे या यामध्ये नावापुढील ग्रीन बॅजमुळे हे सुनिश्चित होत आहे की, बँकेच्या व्हेरिफाइड अकाउंटबरोबर ग्राहकाची बातचीत सुरू आहे. बँकेचे असे म्हणणे आहे की, AIवर आधारित पर्सनल असिस्टंट रोबो च्या मदतीने WhatsApp Banking द्वारे ग्राहकांचे काम काही सेकंदात होईल.

लॉकडाऊन काळात डिजिटल बँकिंगच्या सुविधांचा वापर वाढला आहे. यामुळेच अनेक बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हात मिळवला आहे. या मेसेजिंग अ‍ॅपद्वारे अनेक सेवा ग्राहकांना उपलब्ध होतात. फेसबुकची मालकी असणाऱ्या या कंपनीने काही मोठ्या बँकांबरोबर त्यांची पार्टनरशीप वाढवली आहे. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआई बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे.⭕

Previous articleबापाने लावली कानशिलात सहा; वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Next articleपालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीच्या सत्तर बंगल्यात केमिकल माफियांनचा काळा धंदा;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here