पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे :कोरोनाचं गडद होणारे संकट आणि पुण्याची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त महत्वाची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याच अनुषंगाने शहरातील उत्सवाचे स्वरूप, सार्वजनिक मंडळे आणि घरगुती बाप्पा याबाबत विविध मुद्द्यावर चर्चा झाली.
या बैठकीला उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, आरपीआय गटनेत्या सुनिताताई वाडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस उपायुक्त गोरे, माधव जगताप, बाबा धुमाळ यांच्यासह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
या विषयावर पुढे दिलेले मुद्दे मांडून त्यावर चर्चा करण्यात आली तसेच यासंदर्भात अंतिम निर्णय होऊन यांवर शिक्कामोर्तब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत लवकरच केलं जाईल.
– यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राणप्रतिष्ठापनेची आणि विसर्जन मिरवणूक काढू नये.
– मंडळांनी मंडपाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे.
– मंडपासाठी मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज न करता त्यांना गेल्या वर्षीच्या परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णय
– पुढील वर्षी तोच परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
– घरातील बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन घरातच करावे
– आपल्या शहरातील जवळपास ९०% गणेशोत्सव मंडळे ही कायमस्वरूपी असलेल्या मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन न करता छोट्या मूर्तीचे विसर्जन करतात परंतु दरवर्षी नवीन गणेशमूर्तींचे विसर्जन करणार्या १०% मंडळांनी यंदा राज्यशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
गणपती मूर्ती विक्री स्टॉलधारकांना परवानगी देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच त्याबाबतची नियमावली तयार करून ती जाहीर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.