Home Breaking News त्याचा गुन्हा इतकाच होता की हे उंटाच पिल्लू चुकून शेतात घुसलं म्हणून...

त्याचा गुन्हा इतकाच होता की हे उंटाच पिल्लू चुकून शेतात घुसलं म्हणून त्या क्रुर हैवानांनी त्याचे पाय छाटले – निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू –

128
0

 

त्याचा गुन्हा इतकाच होता की हे उंटाच पिल्लू चुकून शेतात घुसलं म्हणून त्या क्रुर हैवानांनी त्याचे पाय छाटले – निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

दि. १९ – काही दिवसांपासून मुक्या प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांच्या अनेक दुर्दैवी आणि क्रूर कहाण्या समोर येत आहेत. अशीच एक कहाणी राजस्थानच्या चुरूमधून समोर येतेय. इथं एका चार वर्षांच्या उंटाच्या पिल्लाला अतिशय क्रूर पद्धतीनं ठार मारण्यात आलं. त्याचा गुन्हा इतकाच होता की हे पिल्लू चुकून शेतात घुसलं होतं.

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसात फटाके भरून खायला घातल्यानं तिच्या जबड्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर तिचा भूकेनं तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता चुरू जिल्ह्यातील सरदारशहर तालुक्यातील साजनसर गावात मानवजातीला काळिमा फासणारी घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या ४ वर्षांचं एक उंटाचं पिल्लूशेतात शिरलं होतं. हे माहीत पडल्यानंतर काही हैवानांनी क्रूरतेच्या सगळ्या सीमारेषा ओलांडल्या.

या लहानशा उंटावर कुऱ्हाडीनं वार करण्यात आल्याचं समोर येतंय. त्याचे पाय तोडून धडापासून वेगळे करण्यात आले होते. जीवांच्या आकांताने ओरडणाऱ्या या उंटाला वाचवण्यासाठी आलेल्या दोन जणांना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली.

पन्नाराम मेघवाल, गोपीराम मेघवाल आणि लिछमणराम मेघवाल असं या क्रूर मारेकऱ्यांची नावं आहेत. रविवारी पोलिसांनी त्यांनी अटक केलीय. जखमी उंटाच्या पिल्लाला कल्याणपुरा भागातील गौशालेत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रात्री उशिरा त्याचा तडफडून मृत्यू झाल..मेहरासर चाचेरा गावातील ६० वर्षीय ओमसिंह राजपूत यांनी सरदारशहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

१८ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजल्याच्या सुमारास आपल्या जमिनीवर काम करत असताना अचानक एक उंटीण धावत येताना दिसली. मोटारसायकल वर बसून दोघे जण तिचा पाठलाग करत होते. पुढचा रस्ता बंद असल्यानं उंटिण जागीच उभी राहिली. तेव्हा तीन आरोपींनी तिला घेरून तिच्यावर कुऱ्हाडीनं वार केले, असं प्रत्यक्षदर्शी राजपूत यांनी सांगितलं.

आरोपींनी तिचे पुढचे दोन्ही पाय कापून टाकले होते आणि ती जिवाच्या आकांतानं विव्हळत होती. उंटिणीचा आवाज ऐकून आम्ही घटनास्थळी पोहचलो. परंतु, आरोपींनी आम्हालाही ठार मारण्याची धमकी दिली, असंही त्यांनी म्हटलंय.

यानंतर राजपूत यांनी आरडा ओरडा केल्या नंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतरही या उंटिणीचे प्राण वाचवणं शक्य झालं नाही.

Previous articleनांदेड जिल्ह्यात आज ६६ रूग्णांची भर तर कोरोनातून आज २४ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू –
Next article🛑 गडचिरोलीसह राज्यातील शाळा ३ ऑगस्ट पासून सुरू होणार….! वडेट्टीवार..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here