• Home
  • 🛑 फोर्ट इमारत दुर्घटना: ९ जणांचा मृत्यू, २ जण जखमी; शोध मोहीम अद्याप सुरु 🛑

🛑 फोर्ट इमारत दुर्घटना: ९ जणांचा मृत्यू, २ जण जखमी; शोध मोहीम अद्याप सुरु 🛑

🛑 फोर्ट इमारत दुर्घटना: ९ जणांचा मृत्यू, २ जण जखमी; शोध मोहीम अद्याप सुरु 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 जुलै : ⭕ मुंबईतील फोर्ट परिसरातील जीपीओ कार्यालयासमोरील भानुशाली ही इमारत गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधून बाहेर काढण्याचं काम मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान करत आहेत. दरम्यान, आता श्वानांची देखील मदत घेतली जात आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना शोधण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची श्वान मदत करत आहेत. शेरु आणि उदय हे दोव श्वान बचावकार्यात मदत करत आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारत उपकरप्राप्त इमारत होती. जर्जर झालेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’कडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यात आलं होतं. पालिकेकडूनही आवश्यक ती परवानगी देण्यात आली होती. या इमारतीचे १ एप्रिलपासून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येणार होतं. परंतु लॉकडाऊमुळे हे काम सुरू होऊ शकलेलं नाही, असं स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आलं.

या इमारतीचा एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळला, तर दुसऱ्या भागात रहिवासी अडकले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि आवश्यक वाहने घटनास्थळी दाखल झाली. कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्यासाठी पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने ५० कामगारांची फौज उपलब्ध केली. पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.⭕

anews Banner

Leave A Comment