• Home
  • 🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला 🛑

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला 🛑

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला 🛑
✍️रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जाकादेवी /रत्नागिरी:⭕ छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण ३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले.

यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ,जिल्हा परिषद सदस्य श्री.बने साहेब,पंचायत समिती सदस्य श्री.अभयजी खेडेकर ,प्रा.आरोग्य केंद्र जाकादेवी येथील डॉ.माने सर,बोंडये-नारशिंगे ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच श्रीम.सुहानी कुल्ये,उपसरपंच श्री.महेशजी देसाई,माजी सरपंच श्री. भिकाजी पानगले,ग्रामसेवक श्री.सोनकांबळे साहेब,श्रीम.जयश्री पाटील ( शिक्षिका ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.सुनिलजी धावडे साहेब,कार्यध्यक्ष श्री.संतोषजी आग्रे साहेब आणि खजिनदार श्री.गणेशजी कांबळे यांनी केले.

रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी छावा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

श्री.समीर अनंत धावडे
(सचिव – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी)
www.chavapratishthan.com ….⭕

anews Banner

Leave A Comment