Home Breaking News नांदेड” कोरोनातून १३ रूग्ण बरे झाले तर १४ व्यक्ती बाधित – ...

नांदेड” कोरोनातून १३ रूग्ण बरे झाले तर १४ व्यक्ती बाधित – नांदेड, दि. ६ ; राजेश एन भांगे

153
0

नांदेड” कोरोनातून १३ रूग्ण बरे झाले तर १४ व्यक्ती बाधित –
नांदेड, दि. ६ ; राजेश एन भांगे

कोरोना आजारातून आज 13 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4 बाधित व्यक्ती, तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 9 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 334 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू व्यक्तीची संख्या 20 एवढी झाली आहे.
सोमवार 6 जुलै रोजी प्राप्त झालेल्या 140 अहवालापैकी 112 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तसेच 14 बाधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तींची संख्या 442 एवढी झाली आहे. यात देगलूर नाका मोसिन कॉलनी येथील 20 वर्षाचा 1 पुरुष व 16 वर्षाची 1 महिला. शामनगर येथील 20 वर्षाची 1 महिला व 50 वर्षाचा 1 पुरुष. श्रीनगर येथील 49 वर्षाची 1 महिला, नांदेड विष्णुनगर येथील 29 वर्षाचे 2 पुरुष. किनवट येथील 45 वर्षाचा 1 पुरुष. हिमायतनगर वनारसी गल्ली येथील 41 वर्षाचा 1 पुरुष. नायगाव बोमनाळे गल्ली येथील 54 वर्षाचा 1 पुरुष. मुखेड तगलीन गल्ली येथील 65 वर्षाचा 1 पुरुष. देगलूर नाथनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष. मुखेड येथील 74 वर्षाचा 1 पुरुष. हिंगोली मस्तानशहा नगर येथील 22 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.
आतापर्यंत 442 बाधितांपैकी 334 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 88 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 12 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 6 महिला व 6 पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 88 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 40 बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 34 बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 1 बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 2 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार 6 जूलै रोजी 186 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 323,

घेतलेले स्वॅब- 7 हजार 98,

निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 13,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 14,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 442,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,

मृत्यू संख्या- 20,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 334,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 88,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 186 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleनांदेड जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ९ .०६ मि.मी. पाऊसाची नोंद – नांदेड, दि. ६ ; राजेश एन भांगे
Next article🛑 नाशिक शहर ३ हजार पार 🛑 ✍️ नाशिक :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here