Home Breaking News *पाच तरूणांचा बुडून मृत्यू- जव्हारमध्ये धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेले असता:**✍️(▪️राहुल मोरे निवासी...

*पाच तरूणांचा बुडून मृत्यू- जव्हारमध्ये धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेले असता:**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

150
0

**पाच तरूणांचा बुडून मृत्यू- जव्हारमध्ये धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेले असता:**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

पालघर : धबधब्यावर पोहोण्यासाठी आणि आनंद लुटण्यासाठी जाणं तरुणांच्या जीवावर बेतलं आहे.  जव्हारपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर केळीचापाडा (काळशेती ) येथील काळमांडवी धबधब्यावर फिरायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे जव्हार बाजरपेठ बंद असल्याने, अंबिका चौक येथील 13 तरुण काळमांडवी धबधब्यावर बाईक घेऊन पोहण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तसेच हा धबधबा खूप मोठा व खोल दरीत आहे. येथे पावसाळ्यात खाली उतरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. यात तीन मोठ मोठे पाण्याचे डोह आहेत. मात्र येथे गेलेल्या यातील काही तरुणांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही आणि खोलीचा अंदाज न आल्याने या डोहात एकाच वेळी पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
मृत्यांची नावे

● निमेश पटेल, देवेंद्र (बाळा) फलटणकर, देवेंद्र(दादू) वाघ, प्रथमेश चव्हाण, जय(रिंकू) भोईर अशी मृतांची नावं आहेत. हे पाचही तरुण 18 ते 22 वयोगटातील आहेत. बुडालेल्या पाचही तरुणांचे मृतदेह अग्निशमन दल, एनडीआरएफ यांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करत आहेत.

Previous articleप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next article*मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षक भारतीचे आंदोलन *
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here