Home Breaking News माऊलींच्या महापूजेसाठी ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूर मधे पोचले! 🛑 ✍️मुंबई...

माऊलींच्या महापूजेसाठी ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूर मधे पोचले! 🛑 ✍️मुंबई :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

403
0

🛑 माऊलींच्या महापूजेसाठी ९ तास गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूर मधे पोचले! 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ कोरोनामुळे यंदा वारीचा नेहमीचा सोहळा झाला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा मात्र संपन्न झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी यांनी ही महापूजा केली. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईवरून स्वत:गाडी चालवत आषाढिच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहचले. 9 तास त्यांनी स्वत: ड्रायव्हिंग केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी आणि आदित्य ठाकरेही होते. कोरोनामुळे गेले काही दिवस मुख्यमंत्री स्वत:च कार चालवत बैठकांना आणि इतर कार्यक्रमांना जात आहेत. 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाली होती.
स्वत:च कार चालवत पंढरीला महापूजेसाठी जाणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या सुरक्षेचा ताफाही होता. मात्र कोरोनामुळे त्यांनी ड्रायव्हरला सुट्टी दिली आहे. या 9 तासांच्या प्रवासात मुख्यमंत्री अभंग ऐकत ड्रायव्हिंग करत होते.

मुख्यमंत्री ठाकरे रात्री साडेआठ वाजता पंढरपूरला पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी आराम केला आणि पुन्हा रात्री अडीच वाजता ते महापूजेसाठी मंदिरात दाखल झाले. त्यावेळी आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत होते. यावेळी मानाच्या वारकऱ्यांनीही मुख्मंत्र्यांसोबत महापूजा केली.

मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला होता. पंढरपूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here