• Home
  • यवतमाळ जिल्ह्यात केवळ १०३ मिमी पाऊस! जून संपला प्रतीक्षा पावसाची…🛑 ✍️ यवतमाळ :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

यवतमाळ जिल्ह्यात केवळ १०३ मिमी पाऊस! जून संपला प्रतीक्षा पावसाची…🛑 ✍️ यवतमाळ :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

🛑 यवतमाळ जिल्ह्यात केवळ १०३ मिमी पाऊस! जून संपला प्रतीक्षा पावसाची…🛑
✍️ यवतमाळ 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

यवतमाळ :⭕ यंदा पाऊस भरपूर असल्याचे हवामान खात्याचे अंदाज आहेत. मॉन्सूनही अगदी वेळेवर आला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांची पेरणी वाया जाईल आणि त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येईल, त्यामुळे शेतकरी डोळ्यात प्राण आणून पावसाच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले आहेत. अंदाजाप्रमाणे मॉन्सूनने देश व्यापला असला तरी जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना संपला तरीदेखील जिल्ह्यात केवळ 103 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात कमीअधिक प्रमाणात पावसाची उघडझाप सुरू आहे.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी 163.90 मिमी आहे. यंदा सुरुवातीला मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाची उघडझाप सुरू आहे. जिल्ह्यातून पाऊस गायब झाला नसला तरी कमीअधिक प्रमाणात वेगवेगळ्या भागांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना गरजेनुसार पाणी मिळत आहे. जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसात लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सध्या पिकांना आवश्‍यकतेनुसार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बरी आहे. जिल्ह्यात 30 जूनपर्यंत 104.02 मिमि पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 159.89 मिमि पाऊस नेर तालुक्‍यात झाला आहे. राळेगाव तालुक्‍यात सर्वांत कमी 81 मिमि पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या परिसरात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय पर्जन्यमान
यवतमाळ तालुक्‍यात 92.77, बाभूळगाव 106.19, कळंब 121.52, दारव्हा 91.12, दिग्रस 95.26, आर्णी 135.99, नेर 159.89, पुसद 115.65, उमरखेड 93.18, महागाव 108.29, वणी 97.77, मारेगाव 87.15, झरी जामणी 147.58, केळापूर 98.92, घाटंजी 116.99, तर राळेगाव तालुक्‍यात 81 मिमि पावसाची नोंद झाली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment