Home Breaking News जळगावच्या मूर्तिकारांमध्ये गणेशमूर्तीच्या उंची बाबत संभ्रम !…🛑 ✍️ जळगाव :( विजय पवार...

जळगावच्या मूर्तिकारांमध्ये गणेशमूर्तीच्या उंची बाबत संभ्रम !…🛑 ✍️ जळगाव :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

117
0

🛑 जळगावच्या मूर्तिकारांमध्ये गणेशमूर्तीच्या उंची बाबत संभ्रम !…🛑
✍️ जळगाव 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव :⭕”कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून साधेपणाने साजरा करा, तसेच श्रीगणेशाची मूर्तीही चार फुटांपर्यंत असावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. परंतु शासनाचे आदेश अद्यापपर्यंत मूर्तीकारांना प्राप्त झालेले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला असून, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे “श्रीं’च्या आगमनावरही “कोरोना’चे सावट जाणवत आहे. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असल्याने याठिकाणी कोरोना संसर्ग बळावण्याची भीती असल्याने शासन स्थरावरही गणेशोत्सव कसा साजरा करावा, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
मूर्तीकारांमध्ये संभ्रम
सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने गर्दी न करता साजरा करण्यावर भर दिला आहे. यामुळे जानेवारीपासून मूर्तीकार “श्रीं’च्या मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. परंतु मूर्तींची सार्वजनिक मंडळांकडून अद्यापही बुकिंग न झाल्याने व शासनाने मूर्ती किती फुटाच्या तयार कराव्या, याबाबत आदेश न दिल्याने मूर्तीकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा “कोरोना’च्या संकटामुळे “श्रीं’च्या मूर्तींची बुकिंग झालेली नाही. मूर्तीकारांनी मोठ्या मूर्त्या बनविल्या असून, यात मूर्तीकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी चार फुटांपर्यंतची “श्रीं’ची मूर्ती असावी, अशी घोषणा केली आहे. परंतु मूर्ती बनविण्यासाठी दिवाळी नंतर लगेच सुरवात केली जाते तर जूनमध्ये मूर्त्यांवर रंगाचा हात फिरवला जातो. सद्य:स्थितीत चार फुटाच्या ज्या मूर्त्या बनवल्या आहेत, त्याच विकणार आहे. अद्याप शासनाचे मूर्ती बनविण्यासंबंधी कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाही.
– राजू राणा, मूर्तिकार, जळगाव.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here