🛑“ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन ” तर्फे गरजू कलाकारांना शिधा वाटप 🛑
✍️मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕“ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन” ही संस्था प्रामुख्याने निम्न मध्यमवर्गीय
व मध्यमवर्गीय अशा गायक वादक सुत्रसंचालक हास्य-कलाकार साऊंडमन ई. कलाकारांची संस्था.
कोरोना महामारीने संपूर्ण जगात हाहाःकार माजवीला असतांना त्याचा मोठा फटका या कलाकारांना बसला. छोटीमोठी हाॅटेल्स बार पब्ज लग्न समारंभ वाढदिवस अश्या ठिकाणी रोज शो झाल्यावरच या कलाकारांना मेहेनतांना मिळतो व त्यावरच त्यांचा उदारनिर्वाह चालतो. कोरोनाच्या काळात हे सर्व कार्यक्रम बंद झाल्याने या कलाकारांवर महिना उलटल्यावर उपासमारीचे संकट येऊ घातले होते.
ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष जाधव, उपाध्यक्षा श्रीमती. देवयानी मोहोळ ताई तसेच संस्थेचे सल्लागार श्री.सुनील मोहिते हे पदाधिकारी सर्व ठिकाणी या कलाकरांना सहाय्य मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. पण यश मिळत नव्हते.
यावेळी आदरणीय डॉ.हर्षदीप कांबळे सर, (IAS),उद्योग आयुक्त,मुंबई हे वरिष्ठ सनदी अधिकारी,तरुणांचे प्रेरणास्थान, विचारवंत, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांनी प्रेरित होऊन गरीब समाजासाठी अहोरात्र काम करण्याची जिद्द बाळगून तळागाळातील लोकांसाठी काम करणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ; आपण स्वःताच आठवणीने कलाकारांची विचारपूस करून कलाकारांसाठी अन्न-धान्याची पाकिटे आठवणीने पाठवून कलाकारांना कोरोनाशी लढता-लढता जगण्याचा संदेश व धीर दिलात त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
सर सातत्याने तीन दिवस शिधा वाटपाचे काम सुरू होते.वेगवेगळ्या विभागातून येऊन कलाकार आपली भेट स्वीकारत होते.भेट स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून मन गहिवरून आले. मिमिक्री कलाकार, हसवणारा, रिझवणारा अगतिकपणे आपली भेट स्वीकारत होता. सर आपल्या दान पारमितेला मानाचा जयभिम.
शिधा गरजू कलाकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम काही कलाकारांनी त्यांच्या स्वतःच्या वाहनातून मुंबईच्या प्रत्येक विभागात प्रत्येक कलाकाराला मिळेल याची काळजी घेऊन पोहोचती केली.
सर या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोस्तव समितीचे काम करणारे डॉ.विजय कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन” या संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष जाधव,उपाध्यक्षा श्रीमती.देवयानी मोहोळ ताई तसेच संस्थेचे सल्लागार श्री.सुनील मोहिते व तमाम कलाकार बंधू-भगिनी आम्ही आपले ऋणी आहोत, आपले मनापासून धन्यवाद.
“सर आपण हाक द्या,कलाकार आपल्याला साथ देईल”.
सर पुन्हा आपले आभार
धन्यवाद! ⭕