• Home
  • विठेवाडीत चार एकर मका पिकावर फिरवला रोटर नाशिक ,(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-

विठेवाडीत चार एकर मका पिकावर फिरवला रोटर नाशिक ,(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-

विठेवाडीत चार एकर मका पिकावर फिरवला रोटर
नाशिक ,(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-
लष्करी आळी च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी उचलले पाऊल

मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव वाढल्याने वैतागलेल्या विठेवाडी येथे एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर क्षेत्रावर मका पिकावर ट्रॅक्टर फिरवला या त्याचे जवळपास 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे कृषी शास्त्रज्ञ रुपेश खेडकर व विशाल चौधरी यांनी मका पिकाची पाहणी करून उपाययोजनांबाबत माहिती दिली
तालुक्यातील विठेवाडी येथील नंदलाल निकम या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील गट नंबर147 तीच मका पिकाची पेरणी केली होती याकामी निकम यांना शेत तयार करणे बियाणे, शेणखत ,रासायनिक खत, पेरणी, निंदणी ,खुरपणी, कोळपणी, कीटकनाशके फवारणी असा जवळपास दहा हजार रुपये एकरी खर्च आला आहे पीक ऐन भरात असताना पिकावर लष्करी आळी हल्ला केल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे किटकनाशकांची फवारणी करून देखील प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांनी शेवटी उभ्या पिकावर रोटर फिरण्याचा निर्णय घेतला

anews Banner

Leave A Comment