Home Breaking News पिवळे – केशरी ” रेशनकार्ड धारकांनो… ! महापालिका तुमच्या साठी घेतला महत्त्वाचा...

पिवळे – केशरी ” रेशनकार्ड धारकांनो… ! महापालिका तुमच्या साठी घेतला महत्त्वाचा निर्णय🛑 ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

388
0

🛑 ” पिवळे – केशरी ” रेशनकार्ड धारकांनो… ! महापालिका तुमच्या साठी घेतला महत्त्वाचा निर्णय🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्याच्या विविध योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहे, अशा कोरोना बाधित रुग्णांनी महापालिकेने करार केलेल्या दहा खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्या बिलांची रक्कम महापालिका ‘सीएचएस’ दराने भरणार आहे. मात्र ज्या रुग्णांची स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली आहे, ते या योजनांचे लाभार्थी होऊ शकणार नाही, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या फैलाव रोखण्यासोबतच रुग्णांवर उपचारांसाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत.
महापालिकेचे कोरोना उपचारांकरिता करार केलेल्या रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या रूग्णालयांमध्ये शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार उपचार केले जात आहेत. बाधित आणि संशयीत रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा देण्यात येत. यासोबतच शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्‍टर असोशिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजनांचाही लाभ दिला जात आहे.

जे नागरीक या योजनांसाठी पात्र ठरत नाहीत, तसेच ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहेत अशा रुग्णांनी महापालिकेने करार केलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्या बिलांची रक्कम महापालिका “सीएचएस’ दराने करणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. परंतु ज्या रुग्णांची स्वत:ची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि जे खर्च करु शकतात तसेच जे नागरिक या योजनांचे लाभार्थी होऊ शकत नाहीत त्यांची बिले मात्र महापालिका अदा करणार नाही. शासनाच्या 21 मेच्या अधिसुचनेनुसार सर्व खाजगी रुग्णालयांमार्फत कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

⭕: रुग्णालयाचे नाव :⭕
– सिंबॉयसीस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, लवळे
– भारती हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पुणे सातारा रोड, धनकवडी
– सह्याद्री हॉस्पिटल कोथरुड
– राव नर्सिंग होम, बिबवेवाडी
– दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर
– श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबई- पुणे बायपास, नऱ्हे
– इनलॅक्‍स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क
– पुना हॉस्पिटल, सदाशिव पेठ, अलका टॉकीज शेजारी
– ग्लोबल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, दत्तवाडी पोलीस चौकीजवळ
– भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रा.लि., कात्रज…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here