🛑 कोथरूड विभागातील नगरसेवकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली विभागाची प्रत्यक्ष पाहणी…🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे (कोथरूड):⭕भागातील केळेवाडी,वसंतनगर, राजीव गांधी पार्क, हनुमाननगर या प्रतिबंधित क्षेत्रातील वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समवेत या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण करणेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान नगरसेवक श्री. दीपकभाऊ मानकर, नगरसेविका छायाताई मारणे, वैशालीताई मराठे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त नितीन उदास, सहायक आयुक्त संदीप कदम, आरोग्यप्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, डॉ संतोष मुळे, डॉ अंजली टिळेकर, अतिक्रमण प्रमुख माधव जगताप, उपायुक्त अविनाश सपकाळ, विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक सतीश बनसोडे, इतर अधिकारी, पोलिस व कर्मचारी उपस्थित होते.
सदर पाहणी दरम्यान प्रशासन व पोलिस प्रशासन यांना खालील प्रमाणे सूचना केल्या.
– केळेवाडी येथील पुणे महानगरपालिकेचा स्व. सुंदराबाई गणपत राऊत दवाखाना येथे त्वरित स्वॅब कलेक्शन सेंटर चालू करावे तसेच आवश्यक साधन सामुग्री, मंडप उपयुक्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
– सदर परिसरामधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची यादी करुन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दैनंदीन स्वच्छता करुन घ्यावी. तसेच स्वच्छता केलेले फोटो संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना रोजचे रोज पाठवावे. प्रत्येक सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेर फ्री हॅंड वॉश बेसिन बसविण्यात यावेत.
– प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड (ज्या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी आहे तसेच जे नागरिक इतर आजारांनी बाधित आहे ) व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी क्रस्ना डायग्नोस्टीक द्वारे करण्यात याव्यात. यासाठी मनपा प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात यावी. पॉझिटीव्ह रुग्णांवर आवश्यक ते पुढील सर्व उपचार तातडीने सुरु करावेत, जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही.
– संपूर्ण परिसरासाठी सूक्ष्म प्रतिबंधित झोन तयार करुन आरोग्य विभागातील नर्सेस, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्या, आशा वर्कर यांची मदत घेऊन सर्वेक्षण करण्यात यावे.
– स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासन, मा. पोलिस उपआयुक्त, स्थानिक पोलिस निरिक्षक, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी दैनंदिन समन्वय साधावा.
– सदर ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र योजना राबवून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.
– प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याबाबत मा. आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सदर रुग्णवाहीका रुग्णास वेळेवर उपलब्ध होणेसाठी व वस्तीमध्ये येणे व जाणेचे मार्ग त्यावेळेपर्यंत खुले करुन देणेबाबत पोलिस प्रशासनास सूचना देण्यात आल्या…⭕