• Home
  • भीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा ! ३ जणांचा जागीच मृत्यू! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

भीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा ! ३ जणांचा जागीच मृत्यू! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 भीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा ! ३ जणांचा जागीच मृत्यू! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

चंद्रपूर :⭕ महाराष्ट्रातील अपघातांची मालिका थांबत नसल्याचं दिसत आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इर्टिगा गाडीचा टायर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

नागपूर वरून चंद्रपूरकडे इर्टिगा गाडीतून काही जण प्रवास करत होते. मात्र गाडी अतिशय वेगात असल्याने चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली इथं या गाडीचा टायर फुटला. त्यानंतर ही गाडी तब्बल 100 फूट घासत पुढे निघून गेली. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर या अपघाताबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत…⭕

anews Banner

Leave A Comment