• Home
  • *वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा* *आता कमी प्रमाणात दिसत आहे.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.*

*वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा* *आता कमी प्रमाणात दिसत आहे.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.*

*वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा* *आता कमी प्रमाणात दिसत आहे.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज.*

भावयी सन जेष्ठ महिन्यातील अमावस्या ला असतो.
हा सन बारा बलूतेदारानी करावयाचा असतो.
ह्या सना दिवसी सकाळी गावच्या पोलिस पाटीलानी दिवा काढायचा असतो.
मागच्या वर्षी जमिनीत पुरलेला कुंढा काढून त्या जमिनीत पाणी असेल तर चालू वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस आहे.आणि कोरडी माती असेल तर चालू वर्षी दुष्काळ पडणार असे माणले जात असे. परत त्याच जमिनीमधे तो कुंढा पुरून ठेवतात.

त्यानंतर गुरव समाज, नाभिक समाज, प्रकट समाजातील एका व्यक्तीने संपूर्ण अंगा भोवती लिंबाचे डहाळे बांधून बारा बलूतेदारांच्या घरोघरी जाऊन दारासमोरील पाण्याने भरलेला तांब्या लिंबाच्या डहाळ्याने लवंडून साखर ,गुळ असा उल्पा घेऊन जात असे.

आणि आजच्या दिवसी बळीराजा सर्व शेतीची हात्यारे पुजन करूनच पेरणीला सुरवात करतात.

सायंकाळी जोगन्या,जोगनी गावातून फिरतात .
जोगना हा नाभिक समाजाचा तर जोगनी हा गुरव समाजाचा आणि पिस्स हे प्रकट समाजाकडे असते.
दुसर्या दिवशी गोष्टी समाजाची चौंडेश्वरी देवीची पालखी गावा भोवती प्रदक्षिणा मारून मंदिरात आणली जाते.
सद्ध्या हि परंपरा हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव आणि सांगली जिल्ह्यातील आष्टा व गोटखिंडी गावात फार पूर्वी पासून चालत आलेली आहे.

anews Banner

Leave A Comment