Home Breaking News क्विड ते डस्टर पर्यंत, रेनॉच्या कारवर जबरदस्त सूट मुंबई ( साईप्रजित...

क्विड ते डस्टर पर्यंत, रेनॉच्या कारवर जबरदस्त सूट मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

212
0

🛑 क्विड ते डस्टर पर्यंत, रेनॉच्या कारवर जबरदस्त सूट🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 18 जून : ⭕ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रेनॉल्ट आपल्या कारवर जून महिन्यात ८० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. ऑफर कंपनीची Kwid ते पासून Triber आणि Duster पर्यंत सूटदिली जात आहे. जून महिन्यात रेनॉच्या कोणत्या कारवर किती रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या…

रेनॉ आपल्या या सर्वात स्वस्त कारवर ३९ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहेत. यात १० हजार रुपयांचा डिस्काउंट, १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, १० हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट, रुरल कस्टमर डिस्काउंट याचा समावेश आहे. रेनॉ क्विडची किंमत २.९२ लाख ते ५.०१ लाख रुपयांदरम्यान आहे. लॉकडाऊनमध्ये ऑटो कंपन्यांना जोरदार फटका बसला आहे. परंतु, केंद्र सरकारने ऑटो कंपन्यांनी आपले उत्पादन विक्री करण्यास परवानगी दिल्याने आता कंपन्यांनी आपले उत्पादन विक्री करण्यास हळू हळू सुरुवात केली.

रेनॉची ही प्रसिद्ध एसयूव्ही वर या महिन्यात ८० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले जात आहे. या ८० हजार रुपयांमध्ये १५ हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट, २० हजार रुपयांची लॉयल्टी बेनिफिट्स आणि २० हजार रुपयांचा कॉर्पोरेट रुरल कस्टमर डिस्काउंट याचा समावेश आहे. डस्टरची सुरुवातीची किंमत ८.४९ लाख रुपये आहे. डस्टर कारचे ग्राहक भारतात झपाट्याने वाढले आहेत. सध्या तुम्ही गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर डस्टर कारवर ८० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले जात आहे.

ग्राहकांना कार खरेदीकडे वळवण्यासाठी तसेच त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या स्कीम आणल्या आहेत. ग्राहकांना सूट देण्यासोबतच त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी काही खास योजना सुरू केल्या आहेत. ८० हजार रुपयांच्या बेनिफिट्स शिवाय कंपनी कार खरेदीवर सुरुवातीला तीन महिने ईएमआय जमा न करण्याची ऑफर देत आहे. तसेच रेनॉ आपल्या कारवर ८.९९ टक्के व्याज दरावर लोन ऑफर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here