🛑 नववी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना व्हटसअपद्वारे शिक्षणाचे धडे शिकवणार 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
सोलापूर :⭕कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षित राहावे, या हेतूने केंद्र सरकारने दूरदर्शन व आकाशवाणीच्या ब्रॉडबँड सेवेस परवानगी द्यावी. काही चॅनेल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण विभागाने केली. मात्र, मान्यता मिळाली नसल्याने तुर्तास नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना (१५ जून) व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे दोन कोटी मुले आहेत.
त्यांना शिक्षणाची गोडी रहावी, शिक्षणाच्या प्रवाहात ते कायम राहावेत, या हेतूने त्यांना ऑनलाइन, ऑफलाइनद्वारे शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासंबंधीचा ठोस आराखडा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे. राज्यातील प्रत्येक महापालिका परिसरातील शाळांसाठीही स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र ॲकॅडमीक कार्यक्रम कॅलेंडर तयार केले आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडून दूरदर्शन व आकाशवाणीचे ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, राज्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांना पर्यंत पुस्तके पोहोच केले आहेत केंद्राकडून परवानगी मिळेपर्यंत पहिली ते सातवी किंवा आठवीपासूनच या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांमार्फत अथवा पालकांकडून सोय अध्ययन करावे लागेल, असेही शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या. राज्यातील कोणतीही शाळा सुरु होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
