• Home
  • राष्ट्रवादीत नाराजी! राजु शेट्टींना आँफर दिल्याने!

राष्ट्रवादीत नाराजी! राजु शेट्टींना आँफर दिल्याने!

🛑 राष्ट्रवादीत नाराजी! 🛑
राजु शेट्टींना आँफर दिल्याने!
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

कोल्हापूर:🛑 राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सुरू उमटला आहे. विधानपरिषद निवडणूकीत निष्ठावंतांना डावलले जात असल्याने राष्ट्रवादीत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी कोल्हापूर राष्ट्रवादीतील वातावरण चांगलेच तापले आहे. या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाच्या कोट्यातून उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त कोट्यातून राजू शेट्टी यांना आमदारकीची ऑफर देण्यात आली आहे.
चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील हे स्वतः राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी गेले होते.

ही ऑफर दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष स्थापनेपासून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो आहोत. पवार साहेब जो शब्द देखील तो नेहमी पाळतो. मग विधानपरिषद परिषदेसाठी आम्हा निष्ठावंतांना का डावलले जाते, असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, गेल्या वेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा वाटपाचामध्ये शब्द दिला होता. तो शब्द आता पूर्ण होत आहे. त्यामुळे चळवळीसाठी राजू शेट्टी दोन निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत.
राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांना विधानपरिषदेसाठी दिलेल्या ऑफरनंतर कोल्हापूरच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये निष्ठावंतांना डावलून याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी याकडे लक्ष देतात का हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.🛑

anews Banner

Leave A Comment