Home कोरोना ब्रेकिंग ग्रँटरोड, गिरगाव, मलबार हिल, पेडर रोडमधील रुग्ण दरवाढीचे प्रमाण घटले

ग्रँटरोड, गिरगाव, मलबार हिल, पेडर रोडमधील रुग्ण दरवाढीचे प्रमाण घटले

138
0

🛑 ग्रँटरोड, गिरगाव, मलबार हिल, पेडर रोडमधील रुग्ण दरवाढीचे प्रमाण घटले 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 13 जून : ⭕ करोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून मलबार हिल विधानसभा क्षेत्र असलेला महापालिकेचा ‘डी’ विभाग हा दुसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर कायमच होता. परंतु या विभागाच्या सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी भायखळा, माजगाव या महापालिकेच्या ‘ई’ विभागाची प्रभारी जबाबदारी असतानाही या ‘डी’ विभागाकडे लक्ष कमी होऊ दिले नाही. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपर्यंत टॉप फाईव्हमधील आपले स्थान सोडून या विभागाने करोनाग्रस्तांच्या यादीत १६ व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. मात्र, शांत झालेल्या मलबाल हिल, नेपियन्सी आदी परिसरांमध्ये पुन्हा एकदा रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने घरकाम करणार्‍या नोकरांना कामावर घेण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येत आहेत. या चाचणींमध्ये बहुतांशी नोकरांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र समोर येत आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्र मोडणार्‍या महापालिकेच्या डी विभागात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या सध्या १५५९ एवढी आहे. मात्र, १२ एप्रिल रोजी याच विभागात बाधित रुग्णांची संख्या ९७ एवढी होती. त्यामुळे अवध्या दोन महिन्यांमध्ये ही संख्या १४५० पेक्षा अधिक वाढली आहे. पण सध्या रुग्णांची संख्या १५५९एवढी झाली असली तरी रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे २.७ टक्के एवढे आहेत. या विभागात पहिले रुग्ण हे मलबारहिल, नेपियन्सी रोडवर आढळून आले होते. त्यानंतर जसलोक, ब्रिचकँडी व भाटीया रुग्णालयांमध्ये रुग्ण आढळून आले. त्यानंतर माळीभवन, नारायण वाडी, पारेख वाडी, खेतवाडी, उरणकरवाडी,दया सागर झोपडपट्टी, खटावचाळ,बीआयटी चाळ, तुळशीवाडी, शिमला नगर झोपडपट्टी या मोठ्या वस्त्यांसह गायवाडी, श्रीपती कॅस्टल, अटल हाऊस, निकदवरी लेन, खटावकर भवन, गवालिया टँक रोड, नाना चौक, लॅमिग्टन रोड, बाबुलनाथ रोड, मुंबई सेंट्रल रोड, पेडर रोड, बी.डी रोड,ताडदेव रोड, तेजपाल रोड आदी भागांमध्ये रुग्ण आढळून येवू लागले. सध्या या विभागात रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे २.२४ एवढे असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३० दिवसांवर आला आहे. तुळशीवाडीचा परिसर, खेतवाडी आणि बीआयटी चाळींमध्ये सध्या काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. या विभागात जे एकूण रुग्ण आढळून आले आहेत, त्यातील ५० ते ६० टक्के रुग्ण हे तीन प्रमुख रुग्णालयांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलिस, महापालिका, रेल्वे आदींमधील कर्मचारी आहेत. मात्र, बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेवून त्यांची जास्तीत जास्त चाचणी करण्यावर आम्ही सुरुवातीपासून भर दिला होता. त्यामुळे या विभागातील रुग्णांची आकडेवारी सुरुवातीपासून वाढलेली पहायला मिळत होती. परंतु आज इमारतीतील लोकांपेक्षा झोपडपट्टींमधील लोकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी करून त्यातून रुग्ण शोधणे हीच महत्वाची बाब आहे. त्यामुळे याकडेच आम्ही अधिक भर दिला असल्याचे ‘डी’विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here