🛑 पक्षीय मतभेद विसरून पुन्हा उभा करू ‘रायगड’, तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 5 जून : ⭕ दोन दिवसांपूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसली. राजगड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. वादळामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी केली. रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यानी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी मुंबईहून मांडवा अलिबाग येथे आगमन झालं. त्यांच्यासमवेत मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आणि करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या थळ गावातील नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.
त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ठळक मुद्दे
# आपत्ती काळात जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली,
# हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार .
# कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे,
# प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल,
# आज मी आपले कौतुक करण्यासाठी आलो आहे,
# संकट सर्वांसाठी असते,पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू.
# घरांची पडझड झाली आहे त्याना तातडीने मदत करणार.
# मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्द्ल शासन मदत देणार⭕