🛑 नाशिकमध्ये धडकणार निसर्ग चक्रीवादळ 🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
नाशिक : ⭕
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘निसर्गा’ चक्रीवादळाने सोमवार (दि.१)पासून त्याची दिशा बदलायला सुरुवात केली आहे. येत्या २४ तासांमध्ये हे चक्रीवादळ नाशिकमधून जाणार आहे. त्यामुळे बुधवारी (दि.३) आणि गुरुवारी (दि.४) जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
मान्सून केरळात डेरेदाखल झाला असतानाच अरबी समुद्रात मुंबई आणि गुजरातच्या दक्षिण भागात निसर्गा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. कोकण किनारपट्टीसह रायगड, मुंबई, ठाणे, पालघर असा प्रवास करणार्या या वादळाने आता त्याची दिशा काहीशी बदलली असून, त्याच्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला आहे.