• Home
  • भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान

🛑 भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

जम्मू-काश्मीर :⭕जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला आहे. जम्मू काश्मीरच्या नौशेरा येथील भारताच्या नियंत्रण रेषेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील त्राळमधील सामोह येथे अतिरेकी आणि सैन्य यांच्यात चकमक झाली आणि त्यात आतापर्यंत एक दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत १३ अतिरेकी ठार झाले होते. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन पाकिस्तानी अतिरेक्यांचा सैन्याने सोमवारी खात्मा केला होता. त्याचबरोबर २८ मेपासून सुरू झालेली घुसखोरी रोखण्याच्या मोहीमेत आतापर्यंत चार दिवसात १३ दहशतवादी ठार झाले आहेत.

सैन्याच्या अधिकाऱ्याने ‘आज तक’ या वृत्तसंस्थेला सांगितलं की २८ मे पासून घुसखोरीविरोधी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान १० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तत्पूर्वी, नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी तीन अतिरेकी ठार झाल्याचं सैन्याने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment