Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणेत ग्रामपंचायतीची जागा बळकावण्यासाठी महिला पत्रकारावर दबाव दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

व-हाणेत ग्रामपंचायतीची जागा बळकावण्यासाठी महिला पत्रकारावर दबाव दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

90
0

*व-हाणेत ग्रामपंचायतीची जागा बळकावण्यासाठी महिला पत्रकारावर दबाव दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न*
मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत)-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणे गावी ग्रामपंचायतीची जागा बळकावण्यासाठी गावातील काही समाजकंटकांनी “युवा मराठा न्युज”चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक-महिला पत्रकार श्रीमती आशाताई बच्छाव यांचेवर दबाव टाकण्याचा व अप्रत्यक्षपणे दहशत निर्माण करण्याचा कुटील डाव रचलेला आहे.
याबाबतीत सविस्तर वृत असे की,व-हाणे गावातील मराठी शाळेजवळ ग्रामपंचायतीच्या मालकीची रिक्त पडलेली जागा हि पत्रकार श्रीमती आशा बच्छाव यांनी सामाजिक कार्यासाठी सांभाळून तेथे स्वखर्चाने साफसफाई केली,आणि ऐन उन्हाळ्यात त्या जागेवर ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे व सरपंच श्रीमती संगिता पवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन केले.आणि सदर जागेवर भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन पत्रकार श्रीमती बच्छाव यांनी केलेले असताना,
मात्र सदरची ग्रामपंचायतीची जागा बळकावण्यासाठी अलिकडेच त्या जागेशेजारील घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीने दहशत माजवून महिला पत्रकार श्रीमती बच्छाव यांचेवर दबाव आणण्याचा कुटील डावपेच व राजकारण्यांचे दडपण आणण्याचा निद्यनींय प्रकार चालविला असून याबाबतीत लवकरच महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री यांचेकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून,शासकीय कोटयातून पत्रकारांना निवासस्थानासाठी आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारी जागाही यानिमिताने पत्रकार बच्छाव यांना देण्यात यावी.त्याशिवाय या गावातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशीही मागणी युवा मराठा न्युज चँनलच्या वतीने आता करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here