• Home
  • मुख्यमंत्रीविरुध्द वादग्रस्त पोस्ट ! वणीत शिवसैनिकांकडून तोडफोड!

मुख्यमंत्रीविरुध्द वादग्रस्त पोस्ट ! वणीत शिवसैनिकांकडून तोडफोड!

⭕मुख्यमंत्रीविरुध्द वादग्रस्त पोस्ट ! वणीत शिवसैनिकांकडून तोडफोड! ⭕
यवतमाळ 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध फेसबुक व व्हॉट्सअपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यावरुन वणीमधील संबंधितांवर गुन्हा दाखल केल्यानंतरही शिवसैनिकांना राग शांत झाला नाही़ शिवसैनिकांच्या एका गटाने मंगळवारी सकाळी पोस्ट टाकणार्‍या दोघांच्या दुकानात जाऊन प्रचंड तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना ताब्यात घेतले आहे.

वणी येथील रहिवासी सतीश पिंपळे आणि एका मोबाईल शॉपीचे संचालक विवेक पांडे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक आणि व्हॉटसअपवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली होती.
यामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते. त्यावरुन रविवारी रात्री पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हेही दाखल केले आहेत.

माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा एक गट मंगळवारी सकाळी सर्वप्रथम नांदेपेरा मार्गावरील सतिश पिंपळे यांच्या दुकानावर चालून गेला व त्यांनी दुकाची तोडफोड केली. त्यानंतर शिवसैनिकांनी विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे आपला मोर्चा वळविला. त्यांनी दुकानात शिरुन मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यामुळे परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

anews Banner

Leave A Comment