• Home
  • कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाच्या 38 रुग्णची वाढ तर चौघांचा मृत्यू !

कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाच्या 38 रुग्णची वाढ तर चौघांचा मृत्यू !

⭕ कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाच्या 38 रुग्णची वाढ तर चौघांचा मृत्यू ! ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

कल्याण : कल्याण-डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गेल्या २४ तासात येथे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधितांचा आकडा आता ८०४ वर पोहोचला आहे. आज कोरोनाच्या ३८ रुग्णची वाढ झाली आहे. तर आतापर्यंत २७२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे येथे चिंता वाढत चालल्या आहेत.

कल्याण डोंबिवली मध्ये आतापर्यंत कोरोनामुळे २२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर अशा आजुबाजुच्या शहरांमध्ये ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कल्याणमध्ये ७, डोंबिवलीमध्ये १४ तर टिटवाळा – आंबिवली भागात १७ रुग्णांची आज वाढ झाली आहे.

दरम्यान आज कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार, रुग्णवाहिका सेवा, विनाविलंब उपचारासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

महापालिकेतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी कोरोनाचा वाढता आकडा काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत.

anews Banner

Leave A Comment